सावळज व परिसरातील अवैध धंदे बंद करा : प्रशांत सदामते
स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी ; पोलिसांना निवेदन

सावळज : प्रतिनिधी
सावळज व परिसरातील खुलेआम चालू असलेला मटका, ऑनलाइन कसिनो, गांजा, बेकायदेशीर दारू विक्री त्वरित बंद करावी अन्यथा सावळज औट पोस्ट समोर संघटनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले.
सावळज व परिसरात तील अवैध मटका, ऑनलाईन कसिनो खुलेआम चालू असून गांजा व बेकायदेशीर दारू विक्री राजरोसपणे चालू असल्याने तरुण वर्ग या मटका कसीनोमुळे कर्जबाजारी झाले आहेत. तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच द्राक्ष बागेच्या कामासाठी परराज्यातून बऱ्याच प्रमाणात मजूरवर्ग कामासाठी आलेला आहे. त्यांना गांजाचे व्यसन असल्याने या परिसरात गांजा विक्री ही मोठ्या प्रमाणात बिनदिक्कत चालू आहे. तसेच सावळज औट पोस्टमध्ये झिरो पोलिसाचा राबता आहे. या झिरो पोलिसाला सावळज औट पोस्टमध्ये येऊ देऊ नये. त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी ही निवेदनात केली आहे.
सावळज व परिसरातील अवैध धंदे व औट पोस्ट मधील झिरो पोलिसाचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी केली आहे. यावेळी कारवाईचे आश्वासन पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिल्याने सावळज औट पोस्ट समोरील लक्षवेधी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष विनोद मोरे, रोहित कांबळे,आकाश काटे यांच्या सह्या आहेत.



