# आ.रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण बैठक – रोखठोक न्युज
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रविशेष वृतान्त

आ.रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण बैठक

सीसीटीव्हीसाठी शासन निधी व शिक्षक अदलाबदल धोरणावर स्पष्ट भूमिका

Amazon.in/ONLINE SHOPPING


पुणे :रोखठोक न्यूज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यासोबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली.
शासनाने परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती केली असून, त्यासाठीची आर्थिक तरतूद शाळांकडून करणे अनेक शाळांना शक्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शाळांवर अन्याय होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी शासनानेच स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने करण्यात आली.
तसेच परीक्षा काळात संबंधित शाळेतील सर्व शिक्षकांची एकाच वेळी इतर शाळांमध्ये अदलाबदल केल्यास, शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रक्रियेसाठी अधिक व्यवहार्य, सुसूत्र व पारदर्शक धोरण राबविण्याची गरज असल्याचेही बैठकीत मांडण्यात आले.

यावेळी त्रिगुण कुलकर्णी यांनी सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक बाबी शासनाच्या निदर्शनास आणण्याचे आश्वासन दिले. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व विश्वास वाढविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!