# नववधुवरांनी वृक्षारोपण करूनच केला गृहप्रवेश ; अनोख्या उपक्रमाचे कौतुक. – रोखठोक न्युज
आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्रविशेष वृतान्तसामाजिक

नववधुवरांनी वृक्षारोपण करूनच केला गृहप्रवेश ; अनोख्या उपक्रमाचे कौतुक.

Amazon.in/ONLINE SHOPPING
तासगांव:रोखठोक न्यूज
       निंबळक ता. तासगाव येथील वधुवर चि. अमृत आणि सौ.रुपाली यांनी आपल्या लग्न सोहळ्यातून घरी न जाता आपल्या शेतात वृक्षारोपण करून गृहप्रवेश केला.
      निंबळक येथील माजी सरपंच अधिकराव साळूंखे यांचा मुलगा अमृत यांचा विवाह वज्रचोंडे येथील पांडुरंग शिंदे यांच्या कन्या रुपाली यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर वधू वरांनी घरी न जाता शेतात वृक्षारोपण करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. पुणे येथे नोकरी करणाऱ्या अमृतच्या निर्णयाचे दोन्ही घरच्यांनीही स्वागत करत मान्यता देऊन प्रत्येक वर्षी वाढतें तापमांन आणि होणारा त्रास लक्षात घेता  वृक्षारोपण अनेक पर्यावरणीय समस्या जसे की जंगलतोड, मातीची धूप, अर्ध-शुष्क भागात वाळवंटीकरण , ग्लोबल वार्मिंग आणि म्हणूनच पर्यावरणाचे सौंदर्य आणि संतुलन वाढवते. झाडे हानिकारक वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
       निंबळक येथील वधुवरांनी पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य पार पाडले आहे. झाडे हवेतील कार्बनडायऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात. या वर्षी कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय किर्लोस ओरोस यांच्यावतीने आणि वनखाते व अन्य खात्यांच्या सहकार्याने हजारो  वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असते.शासनास आणि निसर्गास उपयुक्त अश्या उपक्रमांस आपल्या कुठंबातील सदस्य संख्ये इतके वृक्षारोपण करून नवीन उपक्रम राबवीला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!