आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र
सावळजमध्ये अग्रणी नदी वाचवण्यासाठी शेतकरी आक्रमक
७० हून अधिक शेतकऱ्यांचे पोलीस ठाण्यात निवेदन; वाळू उपसा टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी

तासगाव : रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यातील सावळज येथील अग्रणी नदीपात्रातील वाळू उपशाचे टेंडर रद्द करण्याची मागणी तीव्र झाली आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत “टेंडर तात्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन उभे करू,” असा इशारा दिला आहे.
सावळजमधील ७० हून अधिक शेतकऱ्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत या निर्णयाविरोधात एकमुखी विरोध नोंदवला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, बेसुमार वाळू उपशामुळे नदीचा प्रवाह बदलून पाण्याची पातळी घटेल आणि परिसरातील शेती कोरडी पडेल.
“अग्रणी नदी आमच्या शेतीची जीवनरेखा आहे. वाळू उपसा थांबवला नाही तर अस्तित्व धोक्यात येईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विरोधानंतर ठेकेदारांनी उपसा थांबवला असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



