# शिक्षक मागणीसाठी नागेवाडीत शाळेला ठोकले टाळे – रोखठोक न्युज
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक मागणीसाठी नागेवाडीत शाळेला ठोकले टाळे

तहसिलदारांच्या आश्वासनानंतर वर्ग सुरु

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

दोन शिक्षक असलेल्या शाळेतील एक शिक्षक कायम गैरहजर तर दुसरा शासकीय कामात व्यस्त या प्रकाराला वैतागून शुक्रवारी (दि २६) नागेवाडी (ता तासगाव) येथील पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. तीन तास विद्यार्थी शाळेच्या दारात बसले आहे हे कळल्यानंतर तहसिलदार रविंद्र रांजणे यांनी सोमवारी शाळेला शिक्षक मिळवून देण्याची ग्वाही दिली. यानंतर कुलुप काढून वर्ग सुरु करण्यात आले.
नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पहिली ते चवथीचे वर्ग भरतात. शाळेत २४ मुले-मुली असून दोन शिक्षक आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात दोनपैकी एक शिक्षक सतत गैरहजर होते. यंदा शाळा सुरु झालेपासूनही एकच शिक्षक हजर असतात. तर दुस-या शिक्षकांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जाते.
गुरुवारी दिवसभर शिक्षकाविना शाळा सुरु होती. याबाबत विचारणा केली असता प्रशासकीय कामासाठी शिक्षक तासगावात होते असे सांगण्यात आले. मगं वैतागलेल्या पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या गेटलाच कुलूप लावले. याची माहिती शिक्षक सचिन वाकडे यांनी शिक्षण विभागाला दिली.


शाळा बंद केल्यानंतर तब्बल तीन तास शिक्षण विभागाला जाग आली नाही. वरिष्ठांकडून फक्त थातूरमातूर उत्तरे देण्याचे काम सुरु होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिली. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी याबाबतीत निर्देश दिल्यानंतर मात्र शिक्षण विभागाला जाग आली.
नागेवाडीत शाळेला टाळे ठोकल्याची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली.याबाबतीत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. सोमवारी शिक्षक देण्याचे आश्वासन मिळालेनंतर वर्ग सुरु करण्यात आले.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!