# जेष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांना ‘क्रांतिवीर वड्डे ओबांना समाज गौरव’ पुरस्कार जाहीर – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

जेष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांना ‘क्रांतिवीर वड्डे ओबांना समाज गौरव’ पुरस्कार जाहीर

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव: रोखठोक न्यूज

तासगाव येथील दैनिक पुढारीचे जेष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांना अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “क्रांतिवीर वड्डे ओबांना समाज गौरव” पुरस्कार जाहीर झाला आहे.रविवार दि, ९ फेब्रुवारी रोजी मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे अनेक मान्यवराचे हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.आंध्र प्रदेश येथील रायलसीमा येथील क्रांतीवीर वड्डे ओबांना यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात स्वतंत्र पूर्व लढयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या नावाने अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आणि प्रतिष्ठतेचा मानला जातो.क्रांतिवीर वड्डे ओबांना याचे स्वतंत्र पूर्व लढ्यातील योगदान त्याच्या वर असणाऱ्या सेनाधिकारी याच्या जबाबदारीने त्यांनी अनेकांना संरक्षण दिले.त्याच स्वतंत्र पूर्व लढ्यातील योगदान समाजाला प्रेरणा दायी आहे.ईस्ट इंडिया कंपनीच्या लढयात क्रांतिवीर वड्डे ओबांना यांनी सेनाधिकारी म्हणून भूमिका बजावताना त्यांनी वापरलेली रणनीती वाखाणण्याजोगी होती.या महान क्रातीविराच्या नावे देण्यात येणारा ” अखिल भारतीय वडार बोली साहित्य जीवन गौरव पुरस्कार” हा अत्यत प्रतिष्ठतेचा समजला जातो.या पुरस्काराचे मानकरी विठ्ठल चव्हाण हे महाराष्ट्र राज्यातील वडार समाजाचे पहिले “पत्रकार “ठरले आहेत.त्यांनी गेल्या ३४ वर्षांच्या काळात काम करीत असताना अनेकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. गेली ३४ वर्षे ते तासगाव सारख्या अतिसंवेदनशील तालुक्यात निर्भीडपणे वृत्त संकलनाचे काम करीत आहेत.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!