# ढवळीत जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार : अमोल काळे – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्र

ढवळीत जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार : अमोल काळे

Amazon.in/ONLINE SHOPPING

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करा, मनसेचे बीडीओना निवेदन

 तासगाव,रोखठोक न्यूज 
तालुक्यातील ढवळी ग्रामपंचायतीकडून जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे  काम अतिशय निकृष्ट व चुकीच्या पद्धीतीने चालू असून ढवळीत जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी ठेकेदाराला काळया यादीत टाकून कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला. याप्रकरणी मनसेच्या वतीने तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याना  निवेदन देण्यात आले  आहे.
 निवेदनात म्हंटले आहे की,शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे १ मीटर खोली प्रमाणे पाईपलाईन करणे बंधनकारक असतानाही ढवळी गावातील जी.पी. काका पाटील हायस्कूल पासून ते पिंजारी पूल पर्यंत दीड ते दोन फुटा पर्यंत खुदाई करून पाईपलाईन करण्यात आली आहे व याच भागात ब्रेकर चा वापर न करता ठेकेदाराने ब्रेकरचा वापर झाला आहे असे सांगून अधिकाऱ्यांच्या कडून वाढीव दराने बिल काढून अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे.
 प्रशासनाकडून कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणा वरून पाईपलाईन गेली आहे त्या ठिकाणी खड्डा खोदून दाखवण्याऐवजी पाईपलाईन शेजारी ३ फुटाचा खड्डा खोदून दाखवला आहे व काम नियमानुसार केले आहे असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
परंतु या कामामध्ये ठेकादाराने अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे.पुलाजवळ सिमेंटची पाईप वापरणे बंधनकारक असताना सिमेंटची पाईप न वापरता चुकीच्या पद्धतीने पिव्हिसी पाईपलाईन केली आहे, परंतु प्रशासनाला मात्र सिमेंटची पाईप वापरल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच काळे वस्ती येथील ओढ्याजवळ, जिल्हा परिषद शाळा येथील नवीन वसाहत येथील आरफळ कॅनॉल जवळ अश्या तीन ठिकाणी पाईपलाईन न जोडता ठेकेदाराने बिले काढली आहेत. काळे वस्ती ते देसाई मळ्याकडे जाणारी पाईप लाईन सरळ रेषेत असणे गरजेचे असतानाही सुभाष गुरव यांच्या शेतात पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने काम केले आहे.
 जुना वंजारवाडी रोड येथे नवीन पाईपलाईन न करता जुन्या पाईपलाईन ला जोडून प्रशासनाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावातील पाईपलाईन करताना मंजूर असलेल्या मुरुमाचे बेडींग करणे बंधनकारक असताना कुठेही बेडींग केलेले दिसून येत नाही.
लाखो रुपये हडप करण्याचा ठेकेदाराचा डाव दिसून येत आहे तरी या विषयामध्ये आपण स्वतः लक्ष देऊन मी नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांची चौकशी करून ४ ते ५ दिवसात योग्य ती कारवाई करावी व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेआपल्या कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला आहे.
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!