स्वाभिमानीचा रोहित पाटीलांना पाठिंबा – जिल्हाध्यक्ष महेश खराडे
येळावीतील प्रचार सभेत घोषणा ; ऊस उत्पादक शेतकऱ्याचा निर्णय

तासगांव, रोखठोक न्यूज
तासगाव कवठेमंहाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. तालुक्यातील येळावी येथील रोहित पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये महेश खराडे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली. संघटनेच्या या निर्णयाचे तासगाव आणि कवठेमंहाकाळ या दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
संघटनेच्या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर विधानसभा मतदार संघात संघटनेला पूरक विचार असणाऱ्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात रोहीत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भुजंगराव पाटील, अमित रवताळे, गुलाबराव यादव, प्रकाश साळुंखे, विजय रेंदाळकर, अनिल वाघ, विजय पाटील, सचिन वाघ, प्रशांत शिंदे, दामाजी डुबल, संदीप शिरोटे, राजेंद्र पाटील, शशिकांत माने, संदेश खराडे, अशोक खाडे, अनिल पाटील, सागर पाटील, निशिकांत पोतदार, उत्तम चंदनशिवे यांच्यासह इतर संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी
उपस्थित होते.



