# सावळजमध्ये स्कूल व्हॅनने दुचाकीस्वाराला ठोकरले ; 1 वर्षाचा बालक गंभीर जखमी – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

सावळजमध्ये स्कूल व्हॅनने दुचाकीस्वाराला ठोकरले ; 1 वर्षाचा बालक गंभीर जखमी

घटना सीसीटीव्हीत कैद ; पोद्दार जम्बो किड्स स्कूल प्रशासनाबद्दल संताप

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव : रोखठोक न्यूज

सावळज (ता. तासगांव)येथे बुधवारी दुपारी 3:30 च्या दरम्यान सावळसिद्ध पेट्रोल पंप समोर भरधाव वेगाने येणाऱ्या पोद्दार जंबो किड्स स्कूलच्या व्हॅनने दुचाकी वर स्वार असणाऱ्या सावळज मधील एका कुटुंबाला ठोकरल्यामुळे मोठा अपघात घडला. या अपघातात 1 वर्षाचा लहान मुलगा व त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,

सावळज येथील सतीश मारुती कांबळे हे त्यांच्या पत्नी आरती व एक वर्षाचा मुलगा सार्थक यांच्यासह कपडे खरेदी करण्यासाठी तासगाव रोडवर झालेल्या नवीन मॉल कडे चालले होते. उद्या गुरुवार दिनांक 17 रोजी सार्थक चा पहिला वाढदिवस असल्या निमित्ताने त्याला कपडे खरेदी करावी यासाठी हे दाम्पत्य आपल्या एक वर्षाच्या बाळाला दुचाकी वर घेऊन दुकानाकडे चालले होते.

दरम्यान, डोंगरसोनी रोड वर असणाऱ्या पोद्दार जम्बो किड्स स्कूल व्हॅनने सदर दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे कांबळे दांपत्य आपल्या एक वर्षाच्या मुलासह रस्त्यावर गाडी सहित जोरदार आपटले. रस्त्यावर चिमुरड्या सार्थकचे डोके जोरदार आदळल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच या अपघातात सतीश मारुती कांबळे व त्यांची पत्नी आरती कांबळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत, सतीश कांबळे यांचे नातेवाईकांनी पोद्दार जम्बो किड्स यांच्या प्रशासनाकडे घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर प्रशासनाने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोद्दार जम्बो किड्स स्कूल प्रशासनाबाबत सावळज व परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. एक वर्षाच्या चिमूरड्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला इतका भीषण अपघात झाला आहे. याबाबत पोद्दार जम्बो किड्स प्रशासन व स्कूल व्हॅनचा ड्रायव्हर यांना जबाबदार धरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून पालक आपल्या मुलांसाठी पदरमोड करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी व सोडण्यासाठी असलेल्या स्कूलबसही उपलब्ध असते. मात्र स्कूल व्हॅनवर असणारे ड्रायव्हर इतके बेजबाबदार कसे वागू शकतात. एका संपूर्ण कुटुंबाला गाडीने ठोकारल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून ड्रायव्हरने गाडी थांबवणे अपेक्षित होते. परंतु पोद्दार जम्बो किड्स स्कूल व्हॅनचा ड्रायव्हर अपघात स्थळावरून पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सदर घटनेनंतर सावळज व परिसरातील पालकांच्या भीतीचे वातावरण असून अशाप्रकारे स्कूल व्हॅन मध्ये जाणारे आपली मुले सुरक्षितपणे शाळेत पोहोचतात की नाही याबाबतच पालकांना शंका वाटू लागली आहे.

दरम्यान सावळज येथे आज घडलेल्या अपघाताबाबत तासगाव पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गंभीर घटनेनंतर बेजबाबदार उत्तर देणाऱ्या पोद्दार जम्बो किड्स च्या प्रशासनाबाबत ही संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार देण्यात आली आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!