मणेराजुरीत आज (मंगळवारी)स्व समाधान शिबीर
तासगाव / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबीर अभियान आज (दि. २९ एप्रिल) रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसर, मणेराजुरी येथे सकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.
परिसरातील ग्रामस्थांनी याचा लाभघेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. माहिती देताना तहसीलदार पाटोळे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशनकार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांचा लाभ तसेच प्रमाणपत्रांचे वाटप,प्रमाणपत्रा बाबत जनतेच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये विविध दाखले वितरण, यासोबत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहेत तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.



