# धनशक्तीच्या राजकारणाला जनता उत्तर देईल : ॲड. स्वप्नील पाटील – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

धनशक्तीच्या राजकारणाला जनता उत्तर देईल : ॲड. स्वप्नील पाटील

तासगावात भाजपचा उत्साहात प्रचार शुभारंभ

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : रोखठोक न्यूज

तासगाव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रविवारी केलेल्या प्रचार शुभारंभाने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले. तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली गणपती मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला असतानाच भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली.

अॅड. स्वप्नील पाटील यांनी यावेळी विरोधकांवर थेट निशाणा साधत “धनशक्तीच्या जोरावर उमेदवारी देणाऱ्यांना तासगावची जनता ठोस उत्तर देईल. पैशाच्या मागे न लागता काम करणाऱ्या आणि स्थानिकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या उमेदवारांनाच जनाधार मिळणार आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी विरोधकांच्या पॅनेलवर टीका करत “एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात उमेदवार हलवले जातात, यावरून सर्व काही स्पष्ट होते. मतदार विकत घेण्याचा प्रयत्न जनता ओळखते,” असे म्हणत निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रचार शुभारंभाला पक्षनिरीक्षक अनिल लोंढे, धनंजय शिंदे, शहराध्यक्षा स्वाती सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष दिनकर बाबुगडे, तसेच भाजपचे नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. ‘जय श्रीराम’, ‘भाजपचा विजय असो’, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो’, ‘स्वप्निल भैय्या तुम आगे बढ़ो…’ अशा घोषणांनी कार्यक्रमाचा माहोल रंगला.

भाजपने या निवडणुकीसाठी स्थानिक, युवा आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले असून शहराच्या विकासासाठी स्पष्ट रोडमॅप जनतेसमोर ठेवण्यात आल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. “शहराला एका नव्या दिशेने नेण्यासाठी आमचे उमेदवार प्रामाणिक प्रयत्न करतील. तासगावमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निर्णायक बदल घडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!