ढवळीत जलजीवनच्या कामाची चौकशी सुरु, पाणीपुरवठा विभागाची ठेकेदाराला नोटीस
मनसेच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग

तासगाव:रोखठोक न्यूज
तालुक्यातील ढवळी ग्रामपंचायतीकडून जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईन चे हे काम अतिशय निकृष्ट व चुकीच्या पद्धीतीने चालू असून ढवळीत जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी ठेकेदाराला काळया यादीत टाकून कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी बिडीओ संताजी पाटील यांना निवेदनाद्वारे दिला होता.
मनसेच्या या इशाऱ्यानंतर तासगाव पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग खडबडून जागा झाला. सरपंच प्रकाश पाटील,मनसे नेते अमोल काळे यांच्यासह चर्चा करून त्यांनी ठेकेदार अन्वी कंट्रक्शन याला तात्काळ नोटीस काढली आहे.

शुक्रवारी पंचायत समितीत झालेल्या बैठकीत सरपंच , अमोल काळे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यात चर्चा झाली. यात गावठाण हद्दीतील फुटलेले कांक्रीटीकरण करणे, खुडे वस्तीचा रस्ता पूर्ववत करणे, झालेल्या पाईप लाईन वर खड्डे काढून सरपंच व संबधित तक्रारदार यांचे समक्ष पाईप ची खोली दाखविणेत यावी, आवश्यक त्या ठिकाणी जीआय पाईप वापरावी. अशी नोटीस ठेकेदाराला काढण्यात आली अशी माहिती अमोल काळे यांनी दिली.



