# जिल्ह्यात ऑनलाईन कसिनोचा धुमाकूळ – रोखठोक न्युज
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात ऑनलाईन कसिनोचा धुमाकूळ

चालकांवर तात्काळ कारवाई करा, मनसेचे जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन

Amazon.in/ONLINE SHOPPING
तासगाव : रोखठोक न्यूज 
 सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तसेच ग्रामीण भागात ऑनलाईन कसिनो (लॉटरी) चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. युवा पिढी यात बरबात होत असून ते बंद करून त्या चालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले.
 दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी म्हटले आहे  की, कमी वेळेत श्रीमंत होण्याचा आशेने मोठ्या प्रमाणावर पैसे लाऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दररोज ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली लाखो रुपयांची लूट होत आहे. एक मिनिटाच्या या खेळावर लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसत आहे. आता तर ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली खुलेआम गोरगरीब जनतेची लूट सुरू आहे. जिल्ह्यात अनेक तरुण या चक्रव्यूहात गुंतले असून लॉटरीच्या नादासाठी लाखो रुपये गमावून बसले आहेत. अवैध ऑनलाईन कसिनोवाले (लॉटरी) मोठ मोठे अड्डे थाटून बसले आहे.
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!