# तासगाव तालुक्यातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ – रोखठोक न्युज
आपला जिल्हा

तासगाव तालुक्यातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

तालुक्यात ४६.५३ टक्के पाणीसाठा, तर दहा दिवसात १८८.९ मिमी पाऊसाची नोंद, पुणदी तलाव तुडुंब

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव : प्रतिनिधी

मागील १५ दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थितीने हैराण झालेल्या तासगाव तालुक्याला पावसाने दिलासा दिला आहे. वरूणराजाच्या कृपादृष्टीमुळे तालुक्यात केवळ मागील दहा दिवसात पडलेल्या १८८.९ मिमी. १६५.१ टक्के दमदार पावसामुळे तालुक्याच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तालुक्यातील पुणदी तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. तर उर्वरित तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असुन सध्या तालुक्यात एकुण ३३० दलघफु ४६.५३ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.

तासगाव तालुक्यातील सर्वात मोठा तलाव सिध्देवाडी मध्यम प्रकल्पासह अंजनी, पेड, मोराळे, पुणदी, बलगवडे, लोढे सात तलावातील एकुण पाणी साठवण क्षमता ७०९.०५ दलघफु आहे. मात्र मागील १५ दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या तीव्रतेने तासगाव तालुक्यातील पाणी साठ्यात मोठी घट झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईमुळे दुष्काळाची दाहकता वाढली होती. तालुक्यातील सर्वात मोठा सिध्देवाडी मध्यम प्रकल्पासह पेड, मोराळे, पुणदी, लोढे तलावात केवळ मृतपाणीसाठा शिल्लक होता. तर अंजनी, बलगवडे तलाव कोरडे पडले होते. त्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.

मात्र गेली दहा दिवसांपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे परिसरातील नाले, ओढ्यांना पुर आले तर अग्रणी नदी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्याचबरोबर तलावांच्या पाणलोट क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तलावांतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

तासगाव तालुक्यात चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला ४९.९२ दलघफु क्षमतेचा पुणदी तलाव तालुक्यात सर्व प्रथम तुडुंब भरून वाहू लागला आहे. तर केवळ दहा दिवसात कोरडा पडलेल्या ७४.१५ दलघफु क्षमतेच्या अंजनी तलावात ३९.५२ दलघफु पाण्याची आवक झाली आहे. तर पेड तलाव ५५.४३ दलघफु क्षमतेपैकी ३३.७१(६० टक्के) दलघफु पाणी साठा झाला आहे. तसेच ३०२.९५ दलघफु क्षमतेचा सिध्देवाडी मध्यम प्रकल्प कोरड्या पडण्याच्या मार्गावर होता मात्र सध्या या प्रकल्पात ११३.३५ दलघफु पाणी साठा आहे. याचबरोबर मोराळे तलावात १०.५४ दलघफु, लोढे तलावात ७९.९३ दलघफु तर बलगवडे तलावात केवळ मृतपाणीसाठा ३ दलघफु पाणी साठा आहे. टंचाईच्या काळात तालुक्यातील काही तलावात योजनेचे पाणी सोडण्यात आले होते.

चौकट –
तासगाव तालुक्यात १४ जुन रोजीचा पाणीसाठा दलघफु मध्ये पुढील प्रमाणे – तलाव नाव, पाणी साठवण क्षमता, सध्याचा पाणीसाठा, कंसात टक्केवारी

सिध्देवाडी- ३०२.९५-११३.५२(४३.३६ टक्के)
अंजनी- ७४.१५-३९.५२(५३.२९ टक्के)
पुणदी- ४९.९२-४९.९२ (१०० टक्के)
मोराळे- २३.००-१०.५४ (४५.८३ टक्के)
पेड- ५५.६१-३३.७१ (६०.८२ टक्के)
बलगवडे- ३९.९०-३.००(मृतसाठा)
लोढे- १६३.७०-७९.९३(४८.८३ टक्के)
एकुण- ७०९.०५- ३२९.९७ (४६.५३ टक्के)

चौकट –
तासगाव तालुक्यात १ जुन ते १४ जुनपर्यंत झालेले पर्जन्यमान मंडळनिहाय-

मांजर्डे – २८५ मिमी. (२४९ टक्के)
विसापुर – ११९.६ मिमी. (१०४ टक्के)
येळावी – १४१ मिमी. (१२३.३ टक्के)
मणेराजुरी – २२३.८ मिमी. (१९५.६ टक्के)
सावळज – १६८.४ मिमी. (१४७.२ टक्के)
तासगाव – १५५.२ मिमी. (१३५.७ टक्के)
वायफळे – २९९.५ मिमी. (२००.६ टक्के)
एकुण – १८८.९ मिमी. (१६५.१ टक्के

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!