# सावळसिद्ध सोसायटी  तर्फे केशर आंबा रोपांचे वाटप   शताब्दी महोत्सवानिमित्त  उपक्रम – रोखठोक न्युज
आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्र

सावळसिद्ध सोसायटी  तर्फे केशर आंबा रोपांचे वाटप   शताब्दी महोत्सवानिमित्त  उपक्रम

Amazon.in/ONLINE SHOPPING
 तासगांव :रोखठोक न्यूज
 सावळज ता. तासगाव येथील  श्री सावळसिद्ध  विकास सोसायटी, सावळज च्या वतीने संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सभासदांना वृक्षारोपण करण्यासाठी  केशर जातीच्या आंब्याचे रोपे भेट म्हणून देण्यात आले. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक  आप्पासो कत्ते यांच्या हस्ते आंब्याच्या रोपाचे वाटप करण्यात आले.
यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीलाच संस्थेच्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आहे. अग्रणी नदीला पाणी आले आहे.ओढे,नालेला पाणी वाहू लागले आहे. सभासदांना वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन  म्हणून संस्थेतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सावळसिद्ध विकास सोसायटी ही यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने सोसायटीच्या संचालक मंडळ नाविन्यपूर्ण  विविध उपक्रम राबवत आहे. प्रत्येक उपक्रमात सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो.
 यावेळी  संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील व्हा. चेअरमन बाळासाहेब थोरात, ऋषिकेश बिरणे, संचालक प्रशांत कुलकर्णी,संदीप माळी, विनायक पवार, विलास तोडकर राजेंद्र वांडरे, विजय पाटील, शिवाजी पाटील,बाळासो निकम, राजेंद्र सावळजकर,, बंडू पाटील, विनेश पोळ, शिवाजी बुधवले व मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!