# रामदास आठवले मंत्री झाल्याने सावळज मध्ये आनंदोत्सव – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

रामदास आठवले मंत्री झाल्याने सावळज मध्ये आनंदोत्सव

Amazon.in/ONLINE SHOPPING

 कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी ; अनेक विकास कामांना गती मिळणार

तासगांव : रोखठोक न्यूज
 तासगाव तालुक्यातील  सावळज  येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर सावळज येथे फटाक्याची आतिषबाजी व लाडू वाटप करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आनंदोत्सव साजरा  करण्यात आला. एनडीए आघाडीत रामदास आठवले यांना लोकसभा निवडणुकीसाठी  एकही जागा मिळाली नव्हती परंतु त्यांनी प्रामाणिक पणे एनडीए ची भूमिका लोकांपर्यंत पोहचून एनडीए आघाडीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. सावळज गावाशी रामदास आठवले यांचा कायम स्नेह राहिला असुन त्यांचे बालपण याच गावात गेले आहे. त्यांच्या आईंनी त्यांना अतिशय कष्टाने त्यांना मोठे केल्याची भावना अनेक ग्रामस्थ आजही व्यक्त करतात.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून  तासगाव तालुक्यातील सामान्य घटकांना केंद्रबिंदू मानून  अनेक विकास कामे येणाऱ्या काळात पूर्ण केली जातील. अशी माहिती आरपीआयचे तासगांव  तालुकाध्यक्ष   प्रवीण धेंडे यांनी यावेळी दिली.
यावेळी, सतिश धेंडे, पांडुरंग भिसे, महावीर धेंडे, मनिष धेंडे, अमित रणखांबे, बाळू धेंडे, सागर शिंदे, पवन भिसे, अनिकेत पवार, राज भिसे, शाहरुख कांबळे, बबलू धेंडे, मनोहर धेंडे, प्रणील भिसे, अक्षय कांबळे , हर्ष धेंडे, संपत भिसे, सुभाष काटे, योगेश काटे, तुषार कांबळे यासह अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!