# होम पीचवर गेली संजय पाटलांची विकेट – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयविशेष वृतान्तसंपादकीय

होम पीचवर गेली संजय पाटलांची विकेट

तासगाव- कवठेमहांकाळमध्ये ९ हजार ४११ मतांची पिछाडी ;

Amazon.in/ONLINE SHOPPING

१०९ पैकी ८१ गावात विशाल पाटील आघाडीवर ; संजय पाटील यांना फक्त २८ गावांत मताधिक्य

तासगाव, रोखठोक न्यूज
      या लोकसभा निवडणूकीमध्ये विद्यमान  खासदार संजय पाटील यांच्यावर तब्बल एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मैदान मारले आहे. जत विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर पाचही मतदारसंघात विशाल पाटील यांना आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीत ४६ हजारापेक्षा जास्त मताधिक्य देणा-या संजय पाटील यांचे होमपीच असलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी यावेळी मात्र साथ दिली नाही.
      तासगाव तालुक्यात संजय पाटील यांना नाममात्र २ हजार २४६ मतांची आघाडी मिळाली, परंतू कवठेमहांकाळ तालुक्यात ते ११ हजार ६५७ मतांनी पिछाडीवर राहिले आहेत. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना ९ हजार ४११ मतांची आघाडी मिळाली आहे. मतदारसंघातील १०९ गावांपैकी तासगाव तालुक्यातील ४८ पैकी ३२ आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ६१ पैकी ४९ अशा एकूण ८१ गावात विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले. तासगाव तालुक्यातील १६ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १२ अशा २८ गावामध्ये संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे.
तासगाव तालुक्यात विशाल पाटील आणि संजय पाटील यांना मिळालेले गावनिहाय मतदान
        राजापूर : ११०३ – ७३७, येळावी : ३००० – २२६१, जुळेवाडी : ४५३ – ६८६, तुरची : १४६७ – ११६०, ढवळी : १००३ – १००५, वंजारवाडी : ५६४ – २८९, पुणदी : ६०१ – ५१७, आरवडे : १०५३ – ९३६,  गौरगाव : ४८९ – ४०७, वायफळे : १०३२ – १३८६,  यमगरवाडी : २३९ – २२९,  बिरणवाडी : ३१९ – ३४२,  बलगवडे : ६२२ – ६३५, डोर्ली : ३४८ – २२६, कौलगे : ३७९ – ४५३, लोढे : ३१६ – २७५, भैरववाडी : १३ – ४०१.
        तासगाव : ७३१३ – १०४९१,  नेहरूनगर : ८६३ – ४४४, निमणी : ८२५ – ६५०, नागाव (नि) : ६९८ – ५६९,  बेंद्री : ४७५ – १५९,  शिरगाव (क) : ४४० – २६५,  कवठेएकंद : २८५४ – १९४३, वासुंबे : ९४८ – ९२३, चिंचणी : ३२८ – ५३२७, सावर्डे : १३७० – १२२५, वाघापूर : ३२४ – २७५,  खुजगाव : ४२४ – ६४२, बस्तवडे : ६७१ – ९२९, सिध्देवाडी : ८१७ – १२५३, दहिवडी : ६३६ – ५६६, जरंडी : ६६० – ६४८.
       डोंगरसोनी : १०७७ – १३६९,  सावळज : २५०७ – १९५६, वज्रचौंडे : ४४४ – १९७,  मणेराजुरी : ४३७६ – ३१९३, मतकुणकी : ४६५ – ३१४, नागाव (क) : ८५२ – ४२४,  कुमठे : १८६३ – २१६७, धुळगाव : १०७८ – ३४५, उपळावी : १०३२ – ९३०, योगेवाडी : २२८ – ४७५, गव्हाण : १०६१ – ९६२,  अंजनी : १०३१ – ३७०, नागेवाडी : ३०७ – ७८, वडगाव : ५९७ – ७८०, लोकरेवाडी : २२५ – २२२.
कवठेमहांकाळ तालुक्यात विशाल पाटील आणि  संजय पाटील यांना मिळालेले गावनिहाय मतदान
        तिसंगी : ७४७ – ४११, घाटनांद्रे : ८४३ – ६९७, रायवाडी : २८० – २२०, वाघोली : ४११ – ८६, गर्जेवाडी : १६७ – ९७,  कुंडलापूर : २३० – २९३, जायगव्हाण :  ४३१ – ३९८, मळणगाव : ११४४ – ९२३, बोरगाव : १००६ – ९५४, अलकुड (एम) : ४३८ – ३९८, हरोली : ५०३ – ३४३,  शिरढोण : १२८७ – ४७६,  नरसिंहगाव : ८८५ – ३१४, कुची : १६१३ – १०४३,  जाखापूर : ७१७ – ५०६, शेळकेवाडी : २४६ – ३२०
       केरेवाडी : १०५ – १८१, नागज : १३१६ – ७७६, निमज : २८४ – ५१५, घोरपडी : ४०१ – ३९७, विठ्ठलवाडी (घो) : १७९ – १५३, दुधेभावी : ४७१ – ६८०, शिंदेवाडी (घो) : २३५ – २०९, कदमवाडी : १२७ – २३४, आरेवाडी : ६८० – ५२३, आगळगाव : १०८७ – १०६०, झुरेवाडी : ४१६ – १६२,  जाधववाडी : ३५९ – १३८,
       कवठेमहांकाळ : ४९४२ – ३४०७,  मोरगाव : ४५७ – २०८, देशिंग : १२३४ – ७९९, खरशिंग : १२९१ – ६२०, बनेवाडी : ७०६ – ३५२, शिंदेवाडी (हिं) : ६७० – ४३६,  हिंगणगाव : १६३५ – ९७५, विठूरायाचीवाडी : ५४१ – १०४१, थबडेवाडी : २४१ – ६६२,  नांगोळे : ६०९ – ६३३, लंगरपेठ : ५५३ – ४९७, ढालेवाडी : ५०१ – २७७, ढालगाव : १३०६ – ११५३, चोरोची : १२२८ – १६१,  ढोलेवाडी : २७० – १८२, जांभूळवाडी : ३०३ – २०६
       चुडेखिंडी : ३११ – २१०, इरळी : ६९५ – ५१५, अलकुड (एस) : ५९१- ४७६, पिंपळवाडी : २१ – ३४२, अग्रण धुळगाव : ९०६ – ९३९, करोली टी : १२१३ – ९९१,    म्हैशाळ (एम) : ४०८ – २२०, रामपूरवाडी : २५८ – १७८, कुकटोळी : १२४५ – ११२८,  कोंगनोळी : १९४८ – ४६१, सराटी : ४९९ – ७३, लोणारवाडी : ५४७ – ३०८, रांजणी : १३०७ – १२८९, मोघमवाडी : १५० – ११२,  बसाप्पाचीवाडी : ३५२ – ३५१, कोकळे : ९२७ – ११४४, करलहट्टी : २२२ – १८५
तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मिळालेली मते
…………………………………
तालुका       विशाल     संजय  
                   पाटील     पाटील
तासगाव     ४९७९०    ५२०३६   
क.महांकाळ ४४६९५   ३३०३८
…………………………………..
एकूण        ९४४८५     ८५०७४  
 विशाल पाटील यांना मताधिक्य देणारी गावे
तासगाव तालुका :
 राजापूर, येळावी, तुरची, वंजारवाडी, पुणदी, आरवडे, गौरगाव, यमगरवाडी, डोर्ली, लोढे, नेहरुनगर, निमनी, नागाव (नि.), बेंद्री, शिरगाव (क), कवठेएकंद, वासुंबे, सावर्डे, वाघापूर, दहिवडी, जरंडी, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव (क), धुळगाव, उपळावी, गव्हाण, अंजनी, नागेवाडी, लोकरेवाडी.
कवठेमहांकाळ तालुका :
 तिसंगी, घाटनांद्रे, रायवाडी, वाघोली, गर्जेवाडी, जायगव्हाण, मळणगाव, बोरगाव, अलकुड एम, हरोली, शिरढोण, नरसिंहगाव, कुची, जाखापूर, नागज, घोरपडी, विठ्ठलवाडी, शिंदेवाडी (घो), आरेवाडी, आगळगाव, झुरेवाडी, जाधववाडी, कवठेमहांकाळ, मोरगाव, देशिंग, खरशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी (हिं), हिंगणगाव,  लंगरपेठ, ढालेवाडी, ढालगाव, चोरोची, ढोलेवाडी, जांभूळवाडी, चुडेखिंडी, इरळी, अलकुड एस, करोली टी, म्हैशाळ (एम),  रामपूरवाडी, कुकटोळी, कोंगनोळी, सराटी, लोणारवाडी, रांजणी, मोघमवाडी, बसाप्पाचीवाडी, करलहट्टी.
संजय पाटील यांना मताधिक्य देणारी गावे
तासगाव तालुका :
जुळेवाडी, ढवळी, वायफळे, बिरणवाडी, बलगवडे, कौलगे, भैरववाडी, तासगाव, चिंचणी, खुजगाव, बस्तवडे, सिध्देवाडी, डोंगरसोनी, कुमठे, योगेवाडी, वडगाव
कवठेमहांकाळ तालुका :
 कुंडलापूर, शेळकेवाडी, केरेवाडी, निमज, दुधेभावी, कदमवाडी, विठूरायाचीवाडी, थबडेवाडी, नांगोळे, पिंपळवाडी, अग्रण धुळगाव, कोकळे
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!