# माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; या बँकेच्या घोटाळ्यावर काढणार ‘चाबूक मोर्चा’ – रोखठोक न्युज
आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीराजकीय

माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; या बँकेच्या घोटाळ्यावर काढणार ‘चाबूक मोर्चा’

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

सांगली :रोखठोक न्यूज 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नियमबाह्य कर्जवाटप, विविध खरेदीत गैरव्यवहार, नोकरभरती, शासकीय निधी वाटपात सात शाखांत अपहार झाला. बॅंकेची कलम ८८ नुसार चौकशीसुरु आहे. ती तत्काळ पुर्ण करावी. बॅंकेच्या विविध चौकशी सहकार खात्याकडून व्हावी. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा. विद्यमान तसेच मागील संचालक मंडळावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्‍चित करून त्यांची वसुली करावी. बॅंक वाचविण्यासाठी मंगळवारी ( ता. २५) जिल्हा बॅंकेवर चाबूक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कारखान्यांना आणि संस्थांना बेकायदेशीर शेकडो कोटींची रुपयांचे कर्ज

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, जिल्हा परिषद माजी सदस्य भीमराव माने, फारुकभाई जमादार उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता स्टेशन चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,‘ जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. बँकेने सूतगिरण्या कंपन्या कारखाना तसेच जिल्ह्याबाहेरच्या कारखान्यांना आणि संस्थांना बेकायदेशीर शेकडो कोटींची रुपयांची कर्ज दिली. त्यांनी कर्ज बुडवले. कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारीच नेमले आहेत.

थेट शेतकऱ्यांच्या दारात जाताहेत बॅंकेचे कर्मचारी

हे अधिकारी कर्ज बुडवणाऱ्या संस्थांकडे न जाता थेट शेतकऱ्यांच्या दारात जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जवसुली विरोधात आवाज उठवला पाहिजे. सरकारकडून अनुदान दुष्काळासाठी मिळणारा निधी हा जिल्हा बँकेत येतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान निधी वर्ग केला जातो. मात्र हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करताच बँकेचे अधिकारी अपहार करतात. आणि त्या संदर्भातली चौकशी बँकेचे अधिकारी करतात. मुळात बँकेच्या कारभाराची संपूर्ण चौकशी सहकार खात्याने करावी अशी आमची मागणी आहे. या साऱ्या अपहार, गैरव्यवहाराला बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि संचालक जबाबदार आहेत. त्यामुळे सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी.

राजकीय लोकांना संरक्षण

आमदार पडळकर म्हणाले, ‘ जिल्हा बॅंक मुख्यालय बांधकाम, नुतनीकरण, फर्निचर, एटीएम मशिन, नोटा मोजण्याचे मशिन खरेदीत घोटाळा झाला आहे. इस्लामपूर शाखा फर्निचर खरेदीत अपहार झाला आहे. बॅकेने सिक्युरिटायझेशन ॲक्टखाली ६ संस्थांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्या मालमत्ता भाड्याने देणे, विक्री करणे यात दुजाभाव केला जात आहे. राजकीय लोकांना संरक्षण देण्यासाठी तसेच त्यांचे हित सांभाळण्यासाठी त्यांच्याविरोधात संचालक मंडळ निर्णय घेत नाही. शासनाकडून येणाऱ्या दुष्काळी निधी, अनुदान, कर्जमाफी प्रकणातील रक्कमा जिल्हा बॅंक सबंधित लाभार्थी शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग न करता स्वतः वापरते. जिल्हा बॅंकेतील सात शाखेत कोट्यवधीचा घोटाळा झाला. त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळाशिवाय शक्य नाही.

मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावरही कारवाईची मागणी

या प्रकरणी अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. विटा येथील विश्वकर्मा प्लायवूड सेंटर खरेदीची चौकशी करा. मुख्यालय, फर्निचर खरेदी, भ्रष्टाचाराची चौकशी करा. जमिन तारण मुद्रांकांचही घोटाळा केला आहे. सांगलीतील स्वप्नपुर्ती शुगर तर कागदोपत्री असलेली कंपनी आहे. कागदोपत्र नसताना एकाच दिवशी २३ कोटचे कर्ज मंजूर होते. तेच कर्ज वसंतदादाची थकबाकी रक्कम भरण्यासाठी वापरले गेले.
सदाभाऊ खोत म्हणाले, बँकेत अनेक वर्षापासून मनमानी सुरू आहे. जिल्हा बँकेत चोर चोर मावस भाऊ सगळे वाटून खाऊ. सगळ्याच पक्ष्याचे संचालक एकत्र येतात आणि वाटून खातात.
आमदार पडळकर यांची मागणी
* महापालिकेपेक्षा जिल्ह्यातील नगरपालिकांची करआकारणी काही पट, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे

* चिंतामणनगरच्या पुलाचे काम तातडीने करा
मिरजेच किडनी रॅकेट…
सदाभाऊ खोत म्हणाले,‘ मिरजेतील एका दवाखान्यात थेट किडनी रॅकेट असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आहेत. सबंधितांवर कारवाईसाठी आमच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत पोलिसात तक्रार करूनही चौकशी केली जात नाही.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!