# वायफळेत प्रमोद नलवडे यांचा सत्कार – रोखठोक न्युज
आपला जिल्हासामाजिक

वायफळेत प्रमोद नलवडे यांचा सत्कार

पोलीस निरीक्षकपदी बढतीबद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान : गावातील पहिला पोलीस निरीक्षक होण्याचा मान

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

तासगाव : रोखठोक न्यूज
तालुक्यातील वायफळे येथील प्रमोद लक्ष्मण नलवडे यांची नुकतीच पोलीस निरीक्षकपदी बढती झाली. ते आता पुणे येथे सीआयडीला आपली सेवा बजावणार आहेत. वायफळे येथील पहिला पोलीस निरीक्षक होण्याचा मान नलवडे यांनी मिळवला आहे. त्यांना मिळालेल्या बढतीबद्दल वायफळे ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वायफळे येथील प्रमोद नलवडे यांची 2010 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. गेली 14 वर्षे ते महाराष्ट्र पोलीस दलात अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावत आहेत. वायफळे येथील खंडेराया व्यायाम संस्थेचे ते खेळाडू आहेत. कबड्डी व क्रिकेट या खेळामध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले होते.
पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी नाशिक व मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांनी पुणे व सोलापूर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले.
दरम्यान सुमारे 14 वर्षे पोलीस दलात कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची आता पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. सोलापूर येथून त्यांची पुणे सीआयडी येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे वायफळेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नलवडे यांच्या पदोन्नतीबद्दल वायफळे ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती साहेबराव पाटील वायफळेचे लोकनियुक्त सरपंच संतोष नलवडे, दिनकर पाटील, दशरथ नलवडे, जगन्नाथ घोडके, भगवान नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!