श्री सावळसिद्ध सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी पाटील व उपाध्यक्षपदी इंदुताई पोळ

तासगांव ; रोखठोक न्यूज
सावळज ता.तासगाव येथील श्री सावळसिद्ध विकास सोसायटी, लि.सावळज या संस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी जयगोंडा पाटील व उपाध्यक्षपदी इंदुताई जगन्नाथ पोळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून घोरपडे पी. ए.,सहकार अधिकारी, तासगाव यांनी कामकाज पाहिले.
श्री सावळसिद्ध विकास सोसायटीच्या अध्यक्ष दत्तात्रय पाटील व उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुदत संपताच राजीनामा दिल्याने नवीन निवडी करता संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत नव्या निवडी करण्यात आल्या.अध्यक्षपदी शिवाजी जयगोंडा पाटील व उपाध्यक्षपदी इंदुताई जगन्नाथ पोळ यांची बिनविरोध निवड झाली. सध्या संस्थेचे शतकपूर्ती निमित्ताने शताब्दी महोत्सव सुरू आहे. संस्थेचे संस्थापक रामगोंडा पाटील यांचे नातू शिवाजी पाटील यांना शताब्दी महोत्सवात अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. संस्थेच्या इतिहासतील पहिली महिला उपाध्यक्ष होण्याचा मान इंदुताई जगन्नाथ पोळ यांना मिळाला आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सध्या संस्थेचा शताब्दी महोत्सव सुरू असल्याने संस्थेचा यापुढेही नावलौकिक कायम राहावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

यावेळी पॅनल प्रमुख ऋषिकेश बिरणे, मावळते अध्यक्ष दत्तात्रय पाटील, मावळते उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संचालक प्रशांत कुलकर्णी, प्रदीप माळी,संदीप माळी, विनायक पवार, विलास तोडकर,राजेंद्र वांडरे, विजय पाटील, शिवाजी पाटील,बाळासो निकम, राजेंद्र सावळजकर, बंडू पाटील, विनेश पोळ, शिवाजी बुधवले तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.



