शेततळ्यात पडून युवतीचा मृत्यू
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील घटना

तासगांव, प्रतिनिधी
मणेराजूरी -रामलिंगनगर येथील स्नेहल तुकाराम तोडकर या बावीस वर्षीय युवतीचा शेततळ्यात पडून आकस्मित मूत्यू झाला हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला ,सोमवार दुपारपासून ती बेपत्ता होती .
याबाबत घटनास्थळ व तासगांव पोलीसांच्याकडून समजलेली माहिती अशी की ,रामलिंगनगर येथील स्नेहल तुकाराम तोडकर ही 22 वर्षीय युवती सोमवारी दुपारपासून बेपत्ता होती काल दुपारपासून नातेवाईकांनी सर्व ठिकाणी शोधाशोध केली परंतु ती आढळून आली नाही मंगळवारी सकाळी घरापासूनच हजार ते दीड हजार फुटावरील संपत विठ्ठल जमदाडे यांच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पोलीस पाटील दीपक तेली यांनी तासगाव पोलिसांना दिली, तासगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय बजरंग थोरात व एपीआय बाबासो बदने यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला . या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून नक्की कशामुळे मृत्यू झाला याचा तपास तासगाव पोलीस घेत आहेत .



