गव्हाण येथे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
डॉ. दशरथ जाधव यांचा पुढाकार

तासगांव : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या दिमाकात जिल्हा परिषद शाळा गव्हाण येथे साजरा करण्यात आला.प्रत्येक वर्षी देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते रक्तदान शिबिर, वृक्षरोपण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, आरोग्य शिबिर, यावेळी जिल्हा परिषद शाळा गव्हाण येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच कार्यक्रमाचे नियोजन देवेंद्र फडणवीस युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दशरथ जाधव यांनी केले.
याप्रसंगी पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये वही, पेन, पुस्तक, खाऊ व इतर शालेय साहित्य सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच 22 शालेय विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती योजनेत उल्लेखनीय काम केले म्हणून सत्कारही करण्यात आला.याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना वाकडे सर यांनी केली, तर या कार्यक्रमाचे प्रमुख दशरथ जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जाधव यांनी सांगितले की, भविष्यकाळात या शाळेला आम्ही भरभरून मदत करू, या शाळेतील विद्यार्थी एमपीएससी ,यूपीएससी, आयपीएस, सारख्या परीक्षेमध्ये भविष्यामध्ये उत्तीर्ण होऊन या शाळेचे नाव गावाचं नाव विद्यार्थ्यांनी मोठे करावे तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एका गुरुजी व आदर्श व्यक्तीची गरज असते, अशा या थोर व्यक्तींचा आदर्श पण डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगत राहावे आपण नेहमी मोठ्या व्यक्तींचा आदर्श घेऊन जीवन जगलो तर आपली सपने मोठी राहतात आणि भविष्यात आपले जीवन फुलण्यास मदत होते तसेच नानासरकार को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून या शाळेतील काही गरीब विद्यार्थी यांचा संपूर्ण खर्च उचलण्याचा त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय लवकरच जाहीर करू,असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाल मिळत होता याप्रसंगी देवेंद्रजींना व अजित दादांना दीर्घायुष्य लाभो अशी भावना व्यक्त केली तसेच या शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.शेवटी शिक्षकानी आभार मानले.
याप्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम यादव, उपाध्यक्ष जमदाडे मॅडम , उमेश जमदाडे, विजय यादव, किरण जाधव नामदेव राजगे, संतोष पाटील ,आनंदा जाधव, हिम्मत जाधव, दुर्वास वाकडे, दत्ता पवार ,विशाल यादव, वसंत पवार, पत्रकार उल्हास सूर्यवंशी, मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.



