पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज : ॲड. विशाल मोहिते : वांगी येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

वांगी : वार्ताहर
भारतीय मजदुरसंघाचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक सल्लागार समितीचे सदस्य ॲड. विशाल मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त वांगी (ता.कडेगाव) येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना. ॲड. विशाल मोहिते म्हणाले, आज पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेसुमार वृक्षतोड झाल्याने ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढ झाली आहे. निसर्ग आणि पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.
ते म्हणाले, आज समाजात वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वायफळपणे पैसा खर्च केला जातो. असे न करता सामाजिक बांधिलकी समजून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून जन्मदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नारळ, आंबा, पिंपळ, वड यासह विविध प्रकारचे वृक्षांचे रोपण केली आहे. लागण केलेल्या सर्व वृक्ष वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. तरच आपले जीवन अमुल्य व प्रदुषण मुक्त होईल तसेच शुध्द हवा मिळू शकेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वास्थ्य” असा संकल्प आज पासून करूया. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करूया. असे आवाहन ॲड.विशाल मोहिते यांनी केले.
यावेळी वराई संस्थेचे कडेगाव-पलूस विधानसभा प्रमुख गिरीधर सुतार, अनुलोमचे विधानसभा प्रमुख विकास थोरात, सांस्कृतिक वार्तापत्राचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख दिलीप मुळीक, राजेश महाडिक, अमरदीप मोरे, आनंदराव मोरे, सिद्धनाथ मोहिते, प्रमोद पवार, महादेव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सिंधुताई मोहिते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव मोहिते, संग्रामसिंह मोहिते, सुरज मोहिते, वैभव सुतार, ऋषीराज पाटील, रोहन देशमुख, ॲड. विशाल शिर्के यांच्यासह मित्रमंडळी व सरसेनापती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.



