आबांच्या कर्तृत्वाला साजेसे काम करू : आ. सुमनताई पाटील
तासगावात खरेदी विक्री संघाची सभा खेळीमेळीत, सभासदांना भेटवस्तूचे वाटप

तासगाव,रोखठोक न्यूज
स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या नावाला धक्का लागणार नाही असे साजेसे काम करू अशी ग्वाही आमदार सुमनताई पाटील यांनी दिली. त्या ऍड.स्व आर. आर. आबा पाटील खरेदी विक्री संघाच्या 34 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, संघाचे चेअरमन संदीप पाटील, व्हा. चेअरमन सुनील माळी, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील पाटील, माजी चेअरमन पितांबर पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुमन ताई पाटील यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील पाटील म्हणाले की, आबांनी दूरदृष्टी ठेवून तासगावात संस्था उभारल्या. आर. आर.आबा पाटील खरेदी विक्री संघ चांगल्या पद्धतीने चालू आहे. मात्र किसन नागरी पतसंस्था बंद आहे याचे दुःख वाटते. आबांनी उभारलेल्या या मातृसंस्था बंद असल्याचे बघवत नाही. तासगाव सूतगिरणी तात्काळ चालू करावी व आबांच्या नावाला काळीमा लागणार नाही अशा या संस्था आपण चालवूया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाजार समिती सभापती युवराज पाटील यांनी संस्थेचे कामकाज चांगले असून सहकार चालवणे अवघड असल्याचे सांगितले.
संघाचे चेअरमन संदीप पाटील यांनी अहवाल वाचन केले. 2023 सालात संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला संघाचे मॅनेजर सुरेश सगरे यांनी सगळ्याचा वृत्तांत वाचून दाखवत विषयांचे वाचन करत मंजुरी घेतली.
यावेळी कमलताई पाटील, मनीषा पाटील, माजी चेअरमन विलास वामन पाटील, माजी चेअरमन अमोल पाटील, सुधाकर जवळेकर, दिपक पाटील, तानाजी पाटील, विश्वास पाटील,पी. वाय.जाधव,सुरेश पाटील, राजकुमार जोतराव , संदीप पाटील, बाबासाहेब अमृतसागर, सुभाष पाटील, कमल पाटील, लोढे गावचे सरपंच विलास पाटील, युवक राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील, दिलीप पाटील, मॅनेजर सुरेश सगरे, अकाउंटंट जितेंद्र मोरे व सभासद उपस्थित होते.



