रोहितमुळे जिल्ह्याचे भवितव्य सुरक्षित वाटते : खा. विशाल पाटील
तासगावमध्ये कृषीहित प्रदर्शनाचे उद्घाटन ; सलग दुसऱ्या वर्षी आयोजन

तासगांव,रोखठोक न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन तासगांवात आयोजित करण्यात आलेले कृषीहित प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले. कै. वसंतरावदादा पाटील घराण्याचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचे काम आबा कुटुंबियांनी केले असून ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही असे ही खासदार पाटील यावेळी बोलून दाखवले.
तासगांव सांगली रोडवर दत्त मंदिर ग्राऊंड, दत्तमाळ येथे स्व.आर.आर. (आबा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त युवानेते रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कृषीहित प्रदर्शनाचे उद्घाटन खा. विशाल पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. सुमन पाटील, जगन्नाथ मस्के,.जि.म. बँकेचे संचालक सुरेश पाटील, हणमंतराव देशमुख, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे, हणमंतराव देसाई, बाळासाहेब पाटील, राजाराम पाटील, स्मिता पाटील, तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, आदी उपस्थित होते.
तासगांव तालुक्यात आज विविध योजनेतून पाणी आले असून याचे श्रेय हे अंजनीकर आबा कुटुंबियांचे आहे असे सांगून खा. विशाल पाटील म्हणाले, शेतात पाणी आले त्या पाण्यातून शेतात नवनविन वेगवेगळी पिके कशी घेता येतील यासाठी रोहितदादा पाटील यांनी आयोजित केलेले हे कृषीहित प्रदर्शन शेतकऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल असे सांगितले.
रोहितदादांच्याकडे पाहून जिल्हयाचे भवितव्य सुरक्षित आहे असे वाटते : खा. विशाल पाटील.

यावेळी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले, रोहित पाटील यांना तुम्ही आमदार कराल पण रोहित दादाच्या झालेल्या प्रचारसभा, पदयात्रा यामुळे खूप खासदार झाले आहेत. आबा कुटुंबियांचे आणि दादा कुटुंबियांचे संबध खूप वेगळे आहेत. फार कमी वयात रोहित खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कडे पाहून सांगली जिल्हयाचे भवितव्य सुरक्षित आहे असे वाटते असे स्पष्ट करून आबा कुटुंबियांनी कधीच कोणाला उपाशी पाठवलेले नाही असे ही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना युवानेते रोहित पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या कृषीहित प्रदर्शनाचे उद्दघाटन झाल्याचे जाहिर केले. तालुक्यातील पाणी योजना मार्गी लावून दुष्काळी तासगांव तालुका हा राज्याच्या नकाशावरील शब्द पुसण्याचे काम आबांनी केले. तरूणांच्यासाठी आयोजित कौशल्य विकास उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगून शाश्वत विकासाचे पाऊल उचलले जात आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषीभवन उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा वापर व्हावा हा निर्णय देशपातळीवर व्हावा असे ही रोहित पाटील यांनी बोलून दाखवले.
यावेळी बाजार समिती सभापती युवराज पाटील, रविंद्र पाटील, अजित जाधव, डी.ए. माने, अॅड. गजानन खुजट, अमोल पाटील, प्रा. जी. के. पाटील, संजय पाटील, अमित पाटील , खंडू कदम, सर्जेराव पाटील, सौ. नलिनीताई पवार, सौ.शुभांगी साळुंखे,पूनम माळी, संध्याराणी मंडले, सत्वशिला पाटील, आदी उपस्थित होते.



