# विधानसभेला अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नाही : खा. विशाल पाटील – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

विधानसभेला अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नाही : खा. विशाल पाटील

सावर्डेत शेतकरी मेळावा; मा. खासदार संजय पाटील, सुरेश पाटील व रोहित पाटील यांच्यावर टीकेची झोड

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

लोकसभेला विशाल पाटीलसाठी अजितराव घोरपडे यांनी टोकाची भूमिका घेतली.यावेळी घोरपडे सरकार माझ्याबरोबर होते म्हणूनच मी खासदार झालो सरकारांच्या मदतीची जाणीव मला आहे. आम्हाला मदत करणाऱ्याची परतफेड नक्की केली जाईल. जसे लोकसभेला सरकारांशिवाय पर्याय नाही तसेच तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडेशिवाय विधानसभेलाही पर्याय नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे अजितराव घोरपडे यांच्या सोबत राहण्याचा विश्वास सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार विशाल पाटील यांनी हजारो लोकांच्या साक्षीने व्यक्त केला.

सावर्डे तालुका तासगाव येथे आयोजित तासगाव-कवठेमहांकाळ मधील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, राजवर्धन घोरपडे बोरगाव चे ज्येष्ठ नेते निवास नाना पाटील यांच्यासोबत तासगाव मधील तिसऱ्या आघाडीचे नेते व कवठेमंहाकाळ तालुक्यातील शेतकरी आघाडीचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, दहा वर्षात संजय काका जेवढे बोलले नाहीत तेवढे मी एका अधिवेशनात बोललो 2019 व 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आर.आर.आबांच्या चिरंजीवानी मला मदत केली. पण 2024 च्या निवडणुकीत घोरपडे सरकारांनी मला मदत केली त्यामुळे माझा विजय सोपा झाला. शब्द सगळेच देतात पण शब्द पाळला तो घोरपडे सरकारांनी त्यामुळेच मी लाखाच्या मताधिक्याने निवडून आलो विधानसभेचे घोडे मैदान अजून लांब आहे. घोरपडे सरकार व मी बसूनच विधानसभेला निर्णय घेईन. चांगला माणूस मुंबईला पाठवायचा आहे.असेही विशाल पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना अजितराव घोरपडे यांनी लोकसभेच्या निवडणुकी वेळेचा घटनाक्रम सांगितला तसेच वसंतदादाच्या चालिरिती विशाल दादानी शिकायला पाहिजेत.2024 लोकसभा निवडणूक योग्य वेळ होती.मैदान मारायचं या उद्देशानेच मदत केली.इथून पुढच्या काळात जिल्ह्यात नवनवीन प्रक्रिया उद्योग सुरू करताना विशाल पाटलांचा पुढाकार असावा. व्यक्त केली
केवळ राजकीय आधार घेऊन कोणी कोणावर अन्याय करू नये. हे थांबवण्यासाठी आपल्याला चांगली संघटना उभी करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणूक ही सुरुवात आहे इतिहास लिहायचा म्हटलं तर जसं यापूर्वी वसंतपर्व घडून गेल तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्याला विशालपर्व घडावं अशी अपेक्षा अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केली

मेळाव्याचे आयोजक स्वप्निल पाटील यांनी शरद पवारांच्या घराणेशाहीच्या भूमिकेमुळेच तासगाव तालुक्याची वाट लागल्याच्या आरोप केला. तासगाव शहरात विधानसभेला बूथ न लावणारे विशाल पाटील यांच्या विजयाचे श्रेय घेत आहेत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला आम्ही अंजनी व चिंचणीच्या विरोधात अजितराव घोरपडे यांची खिंड लढवायला तयार असल्याचे सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी तासगाव बाजार समितीत सुरू असलेल्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला तसेच तासगाव तालुक्यात सुरेश पाटील व संजय पाटील यांचे सेटलमेंट चे राजकारण असून तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून सेटलमेंट करणाऱ्यांना धडा शिकवू अशी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बदलाची मागणी करणाऱ्यांचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित केला .डॉ. प्रताप नाना पाटील यांनी आपण विधानसभेला इच्छुक आहे आमच्या तिसऱ्या आघाडीतून अनेक इच्छुक आहेत कवठेमंहाकाळ तालुक्यातील ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेऊ आमचे त्याबाबत मतभेद असणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला .
यावेळी कवठेमंहाकाळचे पांडुरंग पाटील बोलताना तासगाव तालुक्यातील सुरेश पाटील व संजय पाटील यांच्या सेटलमेंट वर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली नसती तर विशाल दादांचे मताधिक्य पंचवीस हजाराने वाढले असते. पण सुरेश पाटील हा अविश्वासू नेता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले .लोकसभेला विशाल पाटील यांना बेधडक मदत अजितराव घोरपडे सरकारांनी केली आहे. आता खासदारानी येत्या विधानसभेला मदत करावी असे आवाहन पांडुरंग पाटील यांनी केले. यावेळी चिंचणी व अंजनी सोडून उमेदवार द्यावा असा सुरु सर्वच वक्त्याचा होता.

ग्लुकोज फॅक्टरी च्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार व मार्केट कमिटीला अनेक भानगडी एका महिन्यात बाहेर काढू लोकांनी या दोन्ही घरा व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीच्या पाठीशी राहावे असे आवाहन निमणीचे आर. डी.पाटील यांनी केले
तासगाव तालुक्याच्या मानगुटीवर बसलेले भूत उतरण्यासाठी खासदार विशाल दादा पाटील यांनी मदत करावी 35 वर्षे आम्ही आर.आर. पाटलांसोबत राहून निष्ठेने घर जाळून घेतले प्रामाणिकपणे काम करणारा एकही कार्यकर्ता आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही.सुरेश पाटील यांनी रोहित पाटलाचे राजकारण नासवल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील यांनी केली.
तर आबांच्या माघारी निष्ठेला किंमत उरली नाही असे म्हणून सावळजचे माजी जिल्हापरिषद सदस्य किशोर उनउने यांनी आर.आर. पाटील कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली. खोटे बोलण्यात बाप से बेटा सवाई असे म्हणत अंजनी चिंचणीतून आम्ही आमदारकी कोगनोळीला नेऊन दाखवू असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला.

तर अंजनी म्हणजे केवळ एक घर नसून बाकी अंजनीचा विकास झाला नसल्याचे प्रतिपादन विक्रांत पाटील यांनी केले. अर्जुन थोरात यांनी तिसऱ्या आघाडीत शेतकरी कामगार पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल असे स्पष्ट केले.

, राजवर्धन घोरपडे,दिलीप पाटील,पै. निवास पाटील, अमित पाटील, बाबुराव जाधव, अरुण खरमाटे, सुरेश दौंड, पांडुरंग जाधव, डॉ. विवेक गुरव, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. स्वागत इंद्रनील पाटील तर सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!