# संविधान रक्षणासाठी कटिबद्ध : ना. रामदास आठवले – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

संविधान रक्षणासाठी कटिबद्ध : ना. रामदास आठवले

विधानसभा निवडणुकीत संजयकाकांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन ; सावळज मधील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

संविधानाला कोणालाही धक्का लावता येणार नाही. संविधान धोक्यात असल्याचा खोटा नरेटिव्ह चालवून लोकसभेला विरोधकांनी मोठी चाल खेळली. पण 370 कलम हटवून काश्मीर मध्ये आज संविधान लागू करून दाखवणाऱ्या महायुती सरकारने संविधानाचे खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण केले आहे.नरेंद्र मोदींचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मजबूत करणारे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने लोक विजयी करतील असा विश्वास सामाजिक न्यायचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


कवठेमंहाकाळ तालुक्यातील सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजितराव घोरपडे यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमंहाकाळ मतदारसंघाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सावळज येथे आयोजित प्रचार सभेत आठवले बोलत होते.

त्यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, माझी जन्मभूमी कवठेमंहाकाळ तर कर्मभूमी तासगाव आहे त्यामुळे माझ्या भागातील माझे लोक हे संजय काकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं मला विश्वास आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले, तासगांव तालुक्याचे गेल्या 35 वर्षात फक्त वाटोळं झाले आहे.विरोधकाकडे प्रचारचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे फक्त खोटे आश्वासन देण्याचा उद्योग सुरु आहे.तरुणाच्या हाताला काम मिळायला पाहिजे. म्हणून विकासाचे नवे पर्व सुरु करण्यासाठी महायुतीला संधी द्या.असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना संजयकाका म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रामदास आठवले साहेबाना राज्यभर जावं लागतं आहे. तरीसुद्धा ते मला पाठींबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.संविधान बदलण्याच खोटं नरेटिव्ह विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत सेट केल्याचा फटका बसला.
सविधान बदलण्याचा निर्णय होणार नाही जर तसं काही झालं तर मी सगळ्यात पुढे त्याचा विरोध करण्यासाठी उभा राहीन.मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या.असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.

“विरोधकावर प्रसंग आला आहे बाका कारण याठिकाणी निवडून येणार आहेत संजयकाका”

“ओ बात करते है बडी बडी लेकिन चुनके आने वाली है संजयकाका कि घडी”.

मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांची आज मतदारसंघात दिवसभर मोठी चर्चा होती.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!