# तासगाव – कवठेमहांकाळमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करणार: ना.मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

तासगाव – कवठेमहांकाळमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करणार: ना.मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

आमदार रोहित पाटील यांनी घेतली भेट ;पीपीपी माॅडेलद्वारे युवकांना व्यवसायिक शिक्षण

Amazon.in/ONLINE SHOPPING


तासगाव : प्रतिनिधी

तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यामध्ये लवकरच कौशल्य केंद्रे सुरु करण्याची ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अशी माहिती आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी दिली आहे. या मागणीसाठी आमदार रोहित पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत नामदार मंगलप्रभात यांची भेट घेतली.
सार्वजनिक – खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे कौशल्य विकासासाठी खाजगी क्षेत्रातील उपक्रमांना बळ देणे, समर्थन देणे आणि समन्वय साधणे यासाठी तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यात व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांची लवकरंच उभारणी होईल, अशी माहिती आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी दिली.
आमदार रोहित पाटील म्हणाले, ‘पीपीपी’ माध्यमातून खाजगी क्षेत्राकडून लक्षणीय ऑपरेशनल आणि आर्थिक सहभागासाठी प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे. सेवा, उत्पादन, कृषी व संलग्न सेवा यासाठी चालना मिळणार आहे.
आमदार रोहित पाटील, सरकारने उच्च प्राधान्य क्षेत्रे आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या अंतर्गत २५ क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया (NSDC) ही एक प्रकारची सार्वजनिक खाजगी भागीदारी कंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.
लवकरंच तासगाव आणि कवठेमहांकाळ कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यासाठी योग्य आणि आवश्यक कार्यवाही करा असे निर्देश यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी अधिका-यांना दिले. याशिवाय तासगाव आणि कवठेमहांकाळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अपग्रेड करण्याची ग्वाही नामदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित आर आर पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी
याबाबत बोलताना आमदार रोहित आर. आर पाटील म्हणाले, बेरोजगारी ही माझ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी योगेवाडी-मणेराजुरी मिनी एमआयडीसीचे काम लवकरच सुरु होणार आहे. याशिवाय कौशल्य विकास केंद्रे सुरु झाल्यानंतर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देणार आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!