# द्राक्ष विक्रीला अध्यात्माची जोड द्या-द्राक्षतज्ञ विजय कुंभार – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

द्राक्ष विक्रीला अध्यात्माची जोड द्या-द्राक्षतज्ञ विजय कुंभार

सावळजमध्ये "द्राक्ष दिन" उत्साहात साजरा

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव: रोखठोक न्यूज

द्राक्ष उत्पादनापेक्षाही द्राक्ष मार्केटिंग गरजेचे बनले असून द्राक्ष विक्री करताना महाराष्ट्र सह दक्षिणात्य शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिवमंदिरातून पुजेसाठी द्राक्ष फळाचा मोठा वापर व्हावा, द्राक्ष विक्रीला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. यासाठी शिवरात्री निमित्त दरवर्षी द्राक्ष दिन साजरा करण्यात यावा. असे आवाहन द्राक्ष तज्ञ विजय कुंभार, चेअरमन,यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोडूसर कंपनी, तासगाव यांनी सावळज (ता.तासगाव) येथे श्री.सावळसिद्ध विकास सोसायटी, सावळजच्या वतीने “द्राक्ष दिन” साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने द्राक्ष बागायतदार, व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विजय कुंभार पुढे म्हणाले, द्राक्ष पिकाविषयी ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते आपण सर्वांनी दूर केले पाहिजेत. द्राक्ष पीक हे अनेक औषधावर गुणकारी आहे. कॅन्सर सारख्या असाध्य आजारालाही द्राक्षाचा उपयोग होतो. “द्राक्ष दिन” भारतभर कार्यक्रम होत आहेत. ज्या पद्धतीने वड पूजेला आंबा, संक्रांतीला गाजर पूजेला लागते, त्या पद्धतीने महाशिवरात्रीला द्राक्षाचा नैवेद्य म्हणून उपयोग ग्राहकांनी केला पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे द्राक्ष विक्रीमध्ये उच्चंकी फरक पडेल.

यावेळी द्राक्ष दिनानिमित्त शंकराची आराधना करून आरती म्हणण्यात आली. प्रसाद म्हणून सर्वांना द्राक्ष वाटप करण्यात आली. द्राक्ष व्यापाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पै. ऋषिकेश बिरणे, संदीप पाटील, राजेंद्र हिंगमिरे, प्रवीण धेंडे, महादेव चिवटे, व्हा .चेअरमन इंदुताई पोळ, ज्योती वांडरे संचालक बाळासाहेब थोरात, दत्तात्रय पाटील, प्रशांत कुलकर्णी, बंडू पाटील, संदीप माळी, प्रदीप माळी, विनायक पवार, दत्ता केडगे, शामराव भडके, नितीन तारळेकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, द्राक्ष बागायतदार उपस्थित होते.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!