# तासगाव मध्ये “आंबा महोत्सव” शुभारंभ – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

तासगाव मध्ये “आंबा महोत्सव” शुभारंभ

तासगाव बाजार समितीकडून आयोजन ; आ. रोहित पाटील यांची उपस्थिती

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : प्रतिनिधी

तासगांव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये आंबा महोत्सवाचा शुभारंभ तासगांव कवठेमहाकांळ विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तासगाव येथे आयोजित आंबा महोत्सव मध्ये केशर, रत्नागिरी देवगड हापूस, पायरी, तोतापुरी अशा विविध प्रकारचे आंबे महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले,तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्नाबाबत केलेल्या कामांची माहिती दिली. त्यामध्ये द्राक्ष बागायतदार यांना आपले द्राक्ष उत्पादन तयार झालेनंतर गुजरातमधील अत्याधुनिक बांधलेल्या कोल्ड स्टोअरेजमध्ये आणखी पुढे तीन ते चार महिने टिकू शकतात. अशा पद्धतीने तासगांव तालुक्यात कोल्ड स्टोअरेज उभा करणेत यावेत. या बाबत शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करुन प्रोसाहित करणार असले बाबत सांगितले.

त्याचबरोबर बेदाणा उत्पादनात बेंगलोर येथील कंपनीशी चर्चा करुन आपला बेदाणा त्या कंपनीला आवश्यक असणाऱ्या ग्रेडप्रमाणे कसा तयार करता येईल यादृष्टीने मार्गदर्शनपर कार्यशळाचे आयोजन करणार असले बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शेतकऱ्यांनी अशाच पध्दतीने आपल्या शेतीमध्ये द्राक्ष उत्पादन, ऊस उत्पादन, आंबे उत्पादन इतर फळे, भाजीपाला, शेतीमाल उत्पादन वेगवेगळी पिके घेवून हवामानातील बदलामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळून वेगवेगळया पिक उत्पादनामुळे एका पिकाच्या नुकसानीची भरपाई दुसऱ्या पिकामधून भरुन काढणेचे दृष्टीने शेतीमध्ये चांगले उत्पादन देणारी वेगवेगळी पिके घ्यावीत.असे आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

आंबा महोत्सव शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती, मा. युवराज पाटील म्हणाले, तासगांव तालुका हा कृषिक्षेत्रामध्ये नवनविन उपक्रम आणून कृषिक्षेत्रात क्रांती करणारा तालुका आहे. तालुक्यातील जेष्ठ शेतकरी कै. गणपतराव म्हेत्रे आबा, आर्वे आण्णा यांनी पंढरपूर कासेगांव येथे आपले शेतीमध्ये वेगवेगळ्या ५२ प्रकारच्या आंब्याची लागण करुन सदरचे आंबा उत्पादन प्रसिध्दीसाठी महाराष्ट्रातील व कर्नाटकातील शेतकऱ्यांना आपल्या शेतावर बोलावून आंबा उत्पादनासाठी मार्गदर्शन करुन द्राक्षाला पर्यायी आंबा उत्पादन वाढविणेचे दृष्टीने प्रयत्न केले. तालुक्यातील व आसपासच्या तालुक्यामधून शेतकरी व ग्राहकांनी या आंबा महोत्सवास सहभागी होऊन यासुर्वणसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे म्हणाले, तासगांव तालुक्यातील द्राक्ष उत्पादन त्याच बरोबर द्राक्षावर प्रक्रिया करुन बेदाणा उत्पादन करुन शेतकऱ्यांना बेदाणा उत्पादनातून स्वर्गीय आर. आर आबानी शेतकऱ्यांना बेदाणा मार्केट उभा करुन उत्पादन विक्रीसाठी नविन मार्केट उभा केले. त्याच बरोबर आज रोजी तालुक्यामध्ये आंबा उत्पादन क्षेत्र वाढत असलेने सदरचा आंबा विक्रीसाठी आंबा महोत्सव भरवून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा विक्रीचे नविन मार्केट निर्माण करुन दिलेले आहे. यासंधीचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे आवश्यक आहे. तासगांव तालुक्यातील व आसपासच्या गांवातील सर्व नागरिकांनी या महोत्सवामध्ये आपली उपस्थिती लावून या महोत्सवासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा आंबा मोठ्याप्रमाणात खरेदी करुन प्रति वर्षी अशाच पध्दतीने आंबा महोत्सव भरविणेसाठी बाजार समितीस सहकार्य करावे.

तालुका कृषि अधिकारी अनिल फोंडे म्हणाले, तालुक्यामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे क्षेत्र ४५० एकर झालेले आहे. त्यासाठी कृषि खात्याकडून असणाऱ्या नवनविन अनुदान योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व शेतीउत्पादना बाबत मार्गदर्शन व कृषि खात्याकडून मिळणाऱ्या अनुदाना बाबत सहकार्य करणेत येईल.

आंबा महोत्सव शुभारंभाचे स्वागत संचालक अनिल पाटील यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्राहक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता बाजार समितीचे संचालक खंडू पवार यांनी आभार मानले.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!