सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत १० ऑक्टोबरला

सांगली : प्रतिनिधी
मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, यांच्या पत्रानुसार सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभाग, मुंबई यांच्या अधिसूचना क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.१२/पं.रा.-२ दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम २ (फ) नुसार पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे —
अनुसूचित जाती (महिला) : १,
नागरिकांचा मागासवर्ग : २,
नागरिकांचा मागासवर्ग (महिला) : १,
सर्वसाधारण : ३,
सर्वसाधारण (महिला) : ३,
अशा प्रकारे एकूण १० सभापती पदांसाठी आरक्षणाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
या अनुषंगाने, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता सभापती पदांच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांना नमूद केलेल्या वेळेस व ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



