# तासगावात भाजपकडून तिसरे पॅनेल; “आबा–काका गटाच्या मक्तेदारीला जनता उत्तर देईल”: अॅड. स्वप्नील पाटील – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

तासगावात भाजपकडून तिसरे पॅनेल; “आबा–काका गटाच्या मक्तेदारीला जनता उत्तर देईल”: अॅड. स्वप्नील पाटील

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघात अनेक वर्षे स्व. आर. आर. पाटील (आबा) गट आणि माजी खासदार संजय पाटील गट या दोनच शक्तिकेंद्रांचे वर्चस्व राहिले. तिसरे नेतृत्व उभे राहणार नाही, असा पक्का समज निर्माण झाला होता. मात्र, तासगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपने यंदा पूर्ण ताकदीने प्रवेश करत नगराध्यक्षासह २५ उमेदवारांचे तिसरे स्वतंत्र पॅनेल जाहीर केले आहे. चार दशकांनंतर प्रथमच तिसऱ्या मोठ्या पॅनेलच्या प्रवेशामुळे समीकरणे ढवळली आहेत.

भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले,
“तासगावात दीर्घकाळ दोनच गटांची मक्तेदारी राहिली. पण आता तासगावकरांना पर्याय हवा आहे. त्यांच्याच अपेक्षांमधून भाजपचे पॅनेल उभे राहिले आहे.”

नगराध्यक्षपदासाठी विद्या सागर धाबुगडे यांची उमेदवारी निश्चित करत भाजपने १२ प्रभागांतून २४ उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पारंपरिक पॅनेलसमोर हे नव्या राजकीय स्पर्धेचे आव्हान ठरणार आहे.

अॅड. पाटील यांनी दोन्ही गटांवर टीकास्त्र सोडले. “पैसेवाले उमेदवार, भांडवलशक्ती आणि प्रभावाचा अतिरेकी वापर या दोन्ही गटांच्या निवडणूक शैलीत दिसतो. कोट्यवधी रुपयांची रेलचेल करून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न होतो. पण तासगावकरांना हा पद्धतशीर दबाव कंटाळवाणा झाला आहे,” असे ते म्हणाले.

तसेच, “भाजपने सर्व घटकांना, सर्व समाजांना न्याय देणारे स्वच्छ व नवीन चेहरे दिले आहेत. आम्ही जनतेवर विश्वास ठेवून मैदानात उतरलो आहोत. तासगावकर सूज्ञ आहेत; बदल हवा आहे हे ते दाखवून देतील. यंदा पालिकेत कमळ फुलण्याची शक्यता अधिक आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रपरिषदेला जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे, तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, व्यापार आघाडी अध्यक्ष तानाजी सावंत व क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव पाटील उपस्थित होते.

,

तासगावात आम्ही २५ही जागांवर कमळाची उमेदवारी दिली असली, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय एकत्र आल्यास तासगावला मजबूत व समतोल पॅनेल देणे शक्य होईल. त्यामुळे उमेदवारांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही,”
— अॅड. स्वप्नील पाटील, तालुकाध्यक्ष, भाजप

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!