# तासगावात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी मेळावा; जनसंपर्क कार्यालयाचे होणार उद्घाटन – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

तासगावात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी मेळावा; जनसंपर्क कार्यालयाचे होणार उद्घाटन

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनबांधणी गतीमान

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज तासगाव दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि भाजप पदाधिकारी मेळावा संपन्न होणार आहे. सांगली रोडवरील नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून, जिल्हा व तालुका स्तरावरील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष सम्राट महाडिक,मा. जि. प. अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जेष्ठ नेते दिपक शिंदे म्हैशाळकर, सरचिटणीस विलास काळेबाग, अनिल लोंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भाजप तासगाव तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील यांनी सांगितले की, या मेळाव्यात तालुका कार्यकारिणीतील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार असून, आगामी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाच्या संघटनात्मक तयारीवर सविस्तर चर्चा होईल.

भाजपच्या संघटनबांधणीला नवा वेग
गेल्या काही महिन्यांपासून माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपपासून घेतलेल्या अंतरामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांत बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने तालुक्यात संघटनबांधणी पुन्हा मजबूत करण्याचा संकल्प केला असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आजच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.

स्थानिक राजकारणात उत्सुकता

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा मेळावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, संघटन सशक्त करण्यासाठी नव्या जबाबदाऱ्या सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मेळाव्यामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, भाजपच्या संघटनबांधणीस नवे बळ मिळणार आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!