तासगाव निवडणूक २०२५ : ज्योती पाटील यांच्या ‘घर-घर संपर्क मोहिमेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क मोहिमेला वेग

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. ज्योती अजय पाटील यांच्या घर-घर संपर्क मोहिमेला शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात थेट भेट देत नागरिकांचे प्रश्न शांतपणे ऐकून त्यावर ठोस उपाययोजना मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे मतदारांशी मजबूत नातं निर्माण होत आहे.
माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील यांच्या कार्यकाळातील लोकाभिमुख उपक्रम, तसेच शहरासाठी केलेल्या विकासाभियानामुळे पाटील कुटुंबाविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना आहे. त्याचा लाभ ज्योती पाटील यांच्या प्रचाराला स्पष्टपणे मिळताना दिसत आहे.

शहरातील विविध भागांमध्ये भेटीदरम्यान नागरिकांनी स्वतःहून पुढे येत त्यांना साथ दिल्याने त्यांच्या प्रचाराला वेग आला असून, तासगावच्या भविष्यासाठी आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.



