कवठेएकंद ग्रामस्थांचा संताप उसळला आरोग्य कर्मचारी तृप्ती कांबळे यांच्या तात्काळ निलंबनाची जोरदार मागणी
कारवाई करा नाही तर आंदोलन पेटणार असा इशारा

तासगाव :रोखठोक न्यूज
कवठेएकंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तृप्ती कांबळे यांच्या सततच्या गैरकारभाराने संतापलेल्या ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दारात धडक मारत तात्काळ निलंबनाची मागणी केली. रुग्णांशी उर्मटपणे वागणे, केंद्रात वेळेवर न येणे, ज्येष्ठ व महिलांकडे दुर्लक्ष करणे, घरपोच तपासणी टाळणे, औषधे न देणे आणि काही रुग्णांकडून आर्थिक मागणी केल्याचे गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले.
“गावाच्या आरोग्याला तडजोड नाही. कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचे वारे थांबणार नाहीत,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला. तासगाव तालुका आरोग्य अधिकारी विशाल कारंडे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच सलमान मुजावर, सचिन जाधव, अभिनंदन कोंगनोळे उपस्थित होते.
या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आता अधिकाऱ्यांकडून तातडीच्या निर्णयाची मागणी जोर धरत आहे.



