“गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : श्री सावळसिद्ध विकास सोसायटीतर्फे यशस्वी तरुणांचा गौरव”

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यातील सावळज येथील श्री सावळसिद्ध विकास सोसायटीतर्फे गावातील दोन यशस्वी तरुणांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रतिक विलास तोडकर यांची नॅशनल सीड कॉर्पोरेशन, दिल्ली येथे ट्रेनी अॅग्री स्टोअर या पदावर तर सागर बबन पाटील यांची ग्राम महसूल अधिकारी (गावकामगार तलाठी) या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना सोसायटीचे माजी चेअरमन व पॅनल प्रमुख ऋषिकेश बिरणे म्हणाले, “या दोन्ही निवडीमुळे सावळज गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावातील तरुणांनी केलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद आहे.”
यावेळी सोसायटीचे चेअरमन बंडू पाटील, व्हा. चेअरमन विनायक पवार, शिवाजी पाटील,दत्तात्रय पाटील संदीप माळी,प्रदीप माळी, सचिव मछिंद्र पाटील, बबन पाटील, बाबू मस्के, सुतार मामा उपस्थित होते.



