# दूधदर वाढीसाठी तासगाव तहसील वर बुधवारी धडक मोर्चा – रोखठोक न्युज
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

दूधदर वाढीसाठी तासगाव तहसील वर बुधवारी धडक मोर्चा

दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आयोजन ; शेकडो गाई- म्हशी धडकणार तहसीलवर

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

तासगांव : रोखठोक न्यूज 

गाई -म्हैशी च्या दुधाला मिळणारा अपुरा दर, दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यां चा सामना करणार्‍या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी 3 जुलै रोजी तासगाव तहसील कार्यालया वर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चा बद्दल बोलताना समितीचे अध्यक्ष प्रदीप माने म्हणाले की, सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला. सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात 28 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 48 रुपये दर देण्यात येतो.
परंतु, यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे.
त्यामुळे, आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा.
तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे आणि मोफत विमा सुद्धा मिळावा.
जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
याप्रसंगी, समितीचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील, पुरण मलमे, विशाल शिंदे, बाहुबली पाटील, सम्मेद पाटील, रमाकांत पाटील, अमित पाटील, अरुण यादव, प्रशांत महाडिक इत्यादी सदस्य उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासन कारवाईची नौटंकी करून निव्वळ पाकीट घेण्यामध्ये व्यस्त असतात अशा मुजोर अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी.
– प्रदीप माने पाटील
(दूध उत्पादक संघर्ष समिती, अध्यक्ष)

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!