# श्री सावळसिद्ध सोसायटी तर्फे शताब्दी निमित्त  शालेय स्टेशनरी वाटप – रोखठोक न्युज
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

श्री सावळसिद्ध सोसायटी तर्फे शताब्दी निमित्त  शालेय स्टेशनरी वाटप

Amazon.in/ONLINE SHOPPING
 तासगांव: रोखठोक न्यूज
 सावळज ता. तासगाव येथील श्री सावळसिद्ध विकास सोसायटी लि. सावळज या संस्थेतर्फे  शताब्दी महोत्सव निमित्ताने सावळज गावातील  जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुला मुलींना  शालेय स्टेशनरीचे वाटप करण्यात आले.  संस्थेचे सभासद व कोरोना काळातील आरोग्य दूत सचिन देसाई, विश्वास निकम यांच्या उपस्थितीत शालेय स्टेशनरीचे वाटप करण्यात आले.
श्री सावळसिद्ध विकास सोसायटी लि. सावळज या संस्था  यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने  संस्थेचे संचालक मंडळ  वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या मराठी शाळेतील मुला मुलींना शालेय स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. चार रेघी वही, एक रेघी वही, दोन  रेघी वही, चौकट वही, एक बॉलपेन, शीस पेन्सिल,खोडरबर व शॉपनर यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक, जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर 2, शिवनगर, माळीनगर, शिवाजीनगर, बसवेश्वर नगर या वस्ती शाळा मधून एकूण 341 मुला-मुलींना वर्षभर लागणाऱ्या सर्व शालेय स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अण्णासाहेब  गायकवाड,सुधीर माळवदे, बालाजी मस्के, अनिल सूर्यवंशी, गोपीचंद देशमुख या शिक्षकानी  कार्यक्रमाचे नियोजन केले.
 यावेळी  संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील व्हा. चेअरमन बाळासाहेब थोरात, ऋषिकेश बिरणे, संचालक प्रशांत कुलकर्णी, प्रदीप माळी,संदीप माळी, विनायक पवार, विलास तोडकर राजेंद्र वांडरे, विजय पाटील, शिवाजी पाटील,बाळासो निकम, राजेंद्र सावळजकर,, बंडू पाटील, विनेश पोळ, शिवाजी बुधवले व मोठ्या संख्येने सभासद व मुलांचे पालक उपस्थित होते.
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!