रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्या तासगावात
दिग्गज नेत्यांची उपस्थिती ; सभेसाठी जय्यत तयारी

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित सुमन आर.आर.आबा पाटील यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी (दि.१५) तासगाव येथे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला खा.विशाल पाटील, आ.जयंतरावजी पाटील, आ.विश्वजीत कदम, आ.सुमनताई पाटील आदी दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा तासगाव येथील सिद्धेश्वर चौक येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.तासगाव येथे शरदचंद्रजी पवार यांच्या सभेला डॉ.भारत पाटणकर, शिवसेनेचे (उबाठा)संजय विभुते, शेकापचे दत्तात्रय थोरबोले, दिगंबर कांबळे, अर्जुन थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, अनिताताई सगरे, जयसिंग शेंडगे, वसंतराव चव्हाण, आरपीआय तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तासगाव कवठेमहांकाळ येथील सुज्ञ मतदारांनी येथील प्रचारार्थ सभेच्या निमित्ताने रोहितदादा पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.



