# फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही : शरद पवार ; तासगावात रोहित पाटील साठी प्रचारसभा – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही : शरद पवार ; तासगावात रोहित पाटील साठी प्रचारसभा

विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन संजय पाटील यांना फटकारल

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत. आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करुन माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवत आहेत. निवडणूकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी तासगाव येथील सभेत केले. विधानसभा निवडणूकीत राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना रोहित पाटील यांची निवडून यावेत असे वाटत आहे. या निवडणुकीत रोहित पाटीलला इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, की संपुर्ण राज्यभर विजयाची चर्चा झाली पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळविण्यासाठी २७४ खासदारांची गरज आहे. परंतू मोदी आणि शाह यांनी मात्र लोकसभेला ४०० पार चा नारा दिला. हे बहूमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे. यावरुनच त्यांच्या मनात कांहीतरी वेगळा विषय असावा ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन आम्ही त्यांना रोखले. देशाची सत्ता भाजपची आहे परंतू घटना बदलण्याची ताकद त्यांच्याकडे आता राहिली नाही.
महिलांना महिन्याला १५०० रुपये द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण तिची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलावर अत्याचार झालेले आहेत. दर पाच तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे. तसेच हजारो महिला गायब झालेल्या आहेत ही चिंतेची बाब आहे.
रोहितला कोणीही एकटं पाडू शकत नाही. तासगावं कवठेमहाकाळची तरुण पिढी त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहील.याची मला खात्री आहे. रोहित पाटील सोबत खानापूर -आटपाडी मधून वैभव पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

रोहित आर आर पाटील म्हणाले, तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात आपला विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. गेल्या १० वर्षाच्या खडतर प्रवासात निष्ठावंत शिलेदार आणि सर्वासामान्य जनतेनेच मला आणि आमच्या कटुंबाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. मतदारसंघात ८५० कोटी रुपयाचा निधी आणला. टेंभू, आरफळ, म्हैसाळ योजनेतून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मला रक्त सांडाव लागलं तरी चालेल. पण येत्या २४ तारखेपासून विरोधकांची गुंडगिरी मी मोडून काढणार. संजयकाकानी त्यांच्या सत्तेच्या काळातील कर्तृत्व सांगण्यासाठी एका स्टेजवर माझ्या समोर यावे. फारतर स्टेजची व्यवस्था मी करतो. मला एकटं पाडण्यासाठी सगळे विरोधक ज्या ज्या वेळी एकवटतात तेंव्हा छातीचा कोट करुन जनता आमच्या सोबत उभी राहते.
मतदारसंघाला मी संपूर्ण आयुष्य खर्ची घालायचं ठरवले आहे. पाच वर्षात एमआयडीसी च्या माध्यमातून मोठे उद्योग आणुन तरुणाच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही. याची काळजी या मतदार संघातील जनता घेईल.

विशाल पाटील म्हणाले, राज्यात वसंतदादा व शरद पवाराना मानणा-या लोकांच्या पाठीशी नेहमीच आर आर आबा उभे राहिले. सत्तेशिवाय संजय पाटील यांना जमतं नाही, म्हणून त्यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतली.सत्तेसाठी स्वताच्या मुलाला थांबवून उभे राहिले. संजय काका यांनी आता ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागेल.
अविनाश पाटील म्हणाले, रोहित पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. दिल्लीतून अनेकजण महाराष्ट्र मध्ये येत आहेत. मोदी भांबावले आहेत. या निवडणुकीचा निकाल लागला आहे. उद्याचे विकासाचे पर्व रोहितदादा यांच्या माध्यमातून सुरु होणार आहे.
महेश खराडे म्हणाले, तासगांव तालुक्यात पिठाची चक्की सुद्धा संजयकाका काढू शकले नाहीत. १० वर्षामध्ये लोकांच्या जमिनी घेतल्या, कारखाने लाटले. दिनकर आबांना तासगावच्या कारखान्यासाठी राजकीय आहूती दिली, परंतू संजय पाटील यांनी याच कारखान्याच्या २७ हजार सभासदांच्या घरा-दारावर अक्षरक्ष: नांगर फिरवला आहे.

स्वागत व प्रस्ताविक तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. अर्जुन थोरात, दिगंबर कांबळे, संजय पाटील, वसंतराव चव्हाण, साहेबराव पाटील, राहूल पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, स्मिता पाटील, सुरेश पाटील, जयसिंगराव शेंडगे, बाजार समिती सभापती युवराज पाटील, सतीश पवार, रवींद्र पाटील, शंकरदादा पाटील, विनायक पाटील, हायुम सावनुरकर,अक्षय भैय्या पाटील, देवराज पाटील, अजय पाटील, बाळासाहेब पाटील, टी. व्ही. पाटील, संजय सावंत, सुभाष पाटील हणमंतराव देसाई, संजय हजारे, अमित पाटील, अविराज शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय पाटील विश्वासघातकी : शरद पवार
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, संजय पाटील यांना विधानपरिषेवर आमदार करावे असा आग्रह आर. आर. पाटील यांनी धरला होता. मी त्याच वेळी आर. आर. पाटील यांना सांगितले होते की त्यांना आमदार करू नका. कारण हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही आणि शेवटी तेच खरं झालं. ज्या दिवशी विधानपरिषदेचा कार्यकाल संपला त्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला.भाजपमधून खासदार झाले आणि आता भाजप सोडली.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!