तासगाव तालुका भाजपा अध्यक्षपदी ऍड. स्वप्निल पाटील
तासगाव शहर मंडलाध्यक्षपदी स्वाती सूर्यवंशी; विसापूर मंडल अध्यक्षपदी उदय राजोपाध्ये

तासगाव : रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या आज अध्यक्षपदाच्या निवडी पार पडल्या. भाजपाचे पक्ष निरीक्षक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी पार पडल्या. तासगाव तालुका भाजपा अध्यक्षपदी ऍड. स्वप्नील भैया पाटील व तासगाव शहर मंडल अध्यक्षपदी सौ. स्वाती गोविंद सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर विसापूर येथे झालेल्या बैठकीत पक्ष निरीक्षक पंचायतराज जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विसापूर मंडळ अध्यक्षपदी उदय राजोपाध्ये यांची निवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांकडून निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.भाजप मधील सर्व नव्या- जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तासगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी पक्ष बळकट करण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले.
भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे सूचनेनुसार तासगाव तालुक्यातील मंडल अध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. तासगाव तालुक्यात तासगाव ग्रामीण, तासगाव शहर व विसापूर मंडळातील 21 गावांचा एक मंडल असे तीन भाग आहेत. गेल्या दोन महिन्यापासून भारतीय जनता पार्टी पक्ष सदस्य व सक्रिय सभासद नोंदणीचा कार्यक्रम चालू होता. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव व कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त सदस्य नोंदणी झाली होती. याबद्दल सांगलीचे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक केले होते.
यावेळी किसान मोर्चा महामंत्री संदीप गिड्डे पाटील , भाजपा सरचिटणीस मिलिंद कोरे,दिलीप पवार, विक्रांत पाटील, पंकज पाटील, विशाल भोसले,समाधान साळुंखे विनायक खरमाटे,पंढरीनाथ पाटील,शिरगाव, रवी पाटील , अमोल चव्हाण, हणमंत भोईटे,बजरंग गायकवाड,नवनाथ जाधव,अंकुश सुर्वे व संजय माने सचिन पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



