वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची आरोग्यमय आनंदवारी 2025

मुंबई, रोखठोक प्रतिनिधी
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन – WMO परिवाराने “कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर” माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या तब्बेतेची काळजी म्हणून आरोग्यमय आनंदवारीचे नियीजन करून सावळ्या विठुरायाच्या आनंदवारी मध्ये अतिशय छान नियोजन आणि उत्तम काम केलं आहे.
WMO टीम कडून सासवड पासून ते भंडीशेगाव पर्यंत रोज मोफत गोळ्या औषध वाटप करत होते, या दरम्यान WMO टीमने वारकरी भक्तांना 1000 डजन केळी वाटप केलं आहे याचं बरोबर 10,000 हजार पॅकेट राजगिरा लाडूचे वाटप केलं आहे तसेच चिक्की वाटप आणि गरजू वारकऱ्यांना थंडी पासून बचाव व्हावा म्हणून मोफत ब्लॅंकेट वाटप केले, या सोबत जवळपास 10 हजार वारकरी भक्तांना अन्नदान पण केलं आहे.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या या आरोग्यमय आनंदवारीचे नियोजन WMO चे कार्यवाहक श्री निलेश पोपट पिसाळ व श्री दिपक पुंडलिक मोरे यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले या अनमोल अश्या आनंद वारीच्या कार्यात WMO टीम मधून असंख्या बांधवानी तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अनेक बांधवानी तसेच WMO टीम मधील अनेक प्रबंधक यांनी मनोभावी मदत केली म्हणून हा WMO च्या आनंदवारीचा सोहळा यशस्वी रित्या पार पडला यासाठी विशेष करून मुंबई, पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि सांगली या टीम मधील सर्व प्रबंधक यांनी अनमोल असे कार्य करून सदर उपक्रम यशस्वी रित्या पार पाडला या बद्दल या सर्वांचे अभिनंदन आशीच वारकरी भक्तांची सेवा WMO कडून पुढील वर्षी पण घडो हि सदिच्छा.



