# बेदाणा उधळनीची सोमवारी सहाय्यक निबंधक करणार पाहणी : अमोल काळे – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

बेदाणा उधळनीची सोमवारी सहाय्यक निबंधक करणार पाहणी : अमोल काळे

बाजार समितीला पत्र, प्रत्यक्ष होणार पाहणी

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज नेटवर्क

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे. अशी तक्रार मनसे नेते अमोल काळे यांनी दिली आहे. यासंबंधी बेदाणा उधळनीची सोमवारी १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी सहाय्यक निबंधक रंजना बारहाते करणार आहेत. तासगाव बाजार समितीला त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.

दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी तक्रारीत सांगितले की, बेदाणा उधळणीतून शेतकऱ्यांची अडत्यांनकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लुट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यावधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला बेदाणा सौद्यामध्ये उधळून तो पायाखाली तुडवला जातो.

१५ किलोच्या बेदानाच्या बॉक्समधून सरासरी ३ किलो बेदाण्याची उधळण केली जाते. सौद्यात हवा तो दर नाही मिळाला तर पुन्हा पुढच्या सौद्यावेळी अशीच मालाची उधळण केली जाते. संपूर्ण हंगामात सुमारे तीन ते चार हजार कलमांचा सौदा होतो. जितकी कलमे तितके बॉक्स फोडून मालाची उधळण होते. सौद्यानंतर खाली पडलेला बेदाणा अडतेच गोळा करातात. हंगामात एका सौद्यात सुमारे १०० टनापर्यंत उधळण केलेला बेदाणा खाली पडलेला असतो, असे वर्षभरात १२० ते १३० सौदे होतात वर्षाला तब्बल एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. उधळण झालेला बेदाणा अडते स्वतः ताब्यात घेऊन, पॉलिश करून तो पुन्हा विकतात हा बेदाणा किमान १०० रु. प्रतिकिलो जरी विकला गेला, तरी सुमारे दहा कोटी पर्यंत फायदा अडत व्यापाऱ्यांचा होतो, दीपावळीमध्ये हा माल विकायला काढला जातो.

यातूनच कामगारांना बोनस, उचला दिल्या जातात. खुलेआम बेदाणा उत्पादकांची लुट होत असताना, बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सोयीस्कर कानाडोळा करत आहे. अशा प्रकारे बेसुमारपणे बेदाणा उत्पादकांची लुट होत आहे, याला आळा बसने गरजेचे आहे. शेतकऱ्यांची व्यापारी व खरेदीदार यांच्या साखळीने पिळवणूक होत असून सावकारकी जोरात सुरू आहे. याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली होती यावर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सहाय्यक निबंधक तासगाव यांना पत्र व्यवहार करत बेदाणा उधळनीची प्रत्यक्ष पाहणी करून काळे यांच्या तक्रारीचा अहवाल पंधरा दिवसात द्या असे आदेश दिले आहेत. यावर बेदाणा उधळनीची सोमवारी १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी सहाय्यक निबंधक रंजना बारहाते करणार आहेत. तासगाव बाजार समितीला त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!