आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष वृतान्त
संविधानावर प्रहार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तासगावात तीव्र निषेध

तासगाव: रोखठोक न्यूज
भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याने देशभरात संताप उसळला असून तासगावातही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
तासगाव बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे निषेध आंदोलन झाले. “संविधानाचा अपमान सहन करणार नाही”, “न्यायव्यवस्थेचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या.
यानंतर, तासगाव तहसीलदारांना निवेदन देऊन हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला व युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान संविधानाच्या सन्मानासाठी लढा देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.



