# शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ कटिबद्ध : ॲड. स्वप्निल पाटील – रोखठोक न्युज
आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्रराजकीयविशेष वृतान्त

शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ कटिबद्ध : ॲड. स्वप्निल पाटील

विरोधक आरोपात व्यस्त तर भाजप कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीग्रस्तांसाठी पंचनामे अर्ज भरून दिले

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

“राज्यात अवकाळी पावसाने परिस्थिती गंभीर असताना विरोधक केवळ सोशल मीडियावर स्टेटस फॉरवर्ड करण्यात व्यस्त आहेत, पण तासगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट त्यांच्या शेतात उतरले आहेत,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील यांनी केले.

ते सावळज येथे आयोजित पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी अभियान व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे फार्म भरणे उपक्रम कार्यक्रमात बोलत होते.

ॲड. पाटील म्हणाले की, “राज्यातील अवकाळी परिस्थितीवर विरोधकांकडून रोज निवेदने आणि सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कृती करत शेतकऱ्यांना शासन मदतीचा थेट लाभ मिळावा म्हणून पंचनाम्याचे अर्ज गावागावात जाऊन भरले आहेत. निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी आणि केवळ नेत्यांचे स्टेटस शेअर करणाऱ्यांनी यातून बोध घ्यावा.”

ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन मदतीचा हात दिला असून दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई खात्यावर जमा होईल. शासनाने कर्जवसुलीस स्थगिती दिली आहे आणि कर्जमाफीबाबतही सकारात्मक निर्णय लवकर घेतला जाणार आहे.”

या कार्यक्रमास आरपीआय तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे, शिवसेना युवासेना प्रमुख नंदू मंडले, भाजप सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष शशिकांत माने, किसान मोर्चा अध्यक्ष शैलेश पाटील, पोपट हंकारे, दिलीप कांबळे, सुभाष माळी, विश्वास निकम, सुनील मोरे, अमित झांबरे, विक्रांत पाटील, नेताजी पाटोळे, अंकुश पाटील, आप्पासाहेब चव्हाण आदींसह द्राक्षबागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपने हाती घेतलेला हा उपक्रम तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण ठरला असून, विरोधकांच्या निष्क्रियतेवर यामुळे ठळक बोट ठेवले गेले आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!