# तासगाव नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रशासन सज्ज, शांततेत मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

तासगाव नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रशासन सज्ज, शांततेत मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

तासगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत, सुव्यवस्थित आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष तयारी पूर्ण केली आहे. मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तासगावचे तहसीलदार श्री. अतुल पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी 12 प्रभागांतील एकूण 36 मतदान केंद्रांवर सहा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या अधिपत्याखाली केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई आणि पोलीस कर्मचारी अशा एकूण 200 कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत राहणार आहेत. अतिरिक्त सात राखीव पथकांचाही समावेश करून निवडणुकीच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याची खात्री प्रशासनाने केली आहे.

महिला सशक्तिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीमंत विनायकराव उर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला येथे विशेष ‘पिंक बूथ’ उभारण्यात आले आहे. या केंद्रावर संपूर्ण मतदान प्रक्रिया महिला कर्मचारीच पार पाडणार आहेत. तसेच मुस्लिम महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या आठ मतदान केंद्रांवर परदानशीण मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.

मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व केंद्रांवर मतदार सहाय्यता कक्ष उभारले गेले आहेत. मतदारांना आपला अनुक्रमांक सहज शोधता यावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 पोलीस अधिकारी, 67 पोलीस अंमलदार आणि 102 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी, तासगाव नगरपरिषद यांच्या देखरेखीखाली नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोरपणे पार पाडण्यासाठी सज्ज आहेत.

तासगाव निवडणूक 2025 शांततेत आणि सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत असून नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!