
तासगांव,रोखठोक न्यूज नेटवर्क
बलगवडे (ता. तासगांव) येथील माजी सैनिक गणपतराव धोंडीराम शिंदे (वय 65)यांचा राहत्या घरी रात्री दहा च्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात ते राहत्या घरी पडल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर बलगवडे व डोर्ली गावात खळबळ माजली. मयत शिंदे याची चार चाकी गाडी घेऊन पसार झालेला संशयित धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे . संशयित वैष्णव शिंदे-पाटील ( वय21) याच्याकडे अधिक तपास शोध पोलीस करत आहेत.
घटनास्थळावर मिळालेल्या माहितनुसार, गणपतराव शिंदे हे बुधवारी सायंकाळी गावातील एका धाब्यावर संशयित तरुणासोबत दारू पिण्यासाठी गेले होते. तेथेच गणपतराव आणि वैष्णव यांच्या मध्ये वाद झाला होता. त्यानंतरही गणपतराव शिंदे याच्या घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असावा त्या रागाच्या भरात संशयिताने शिंदे याची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर गणपतराव शिंदे याची चार चाकी गाडी ही तो घेऊन हल्लेखोर पसार झाल्याची माहिती मिळत आहे.
गणपतराव शिंदे हे नवीन डोर्ली बस स्थकानजीक एकटेच वास्तव्यास होते. एक मुलगा सीआरपीएफ मध्ये आहे तर दुसरा मुलगा पुणे येथे इंजिनीयर आहे. पत्नी मयत आहे त्यामुळे शिंदे हे एकटेच राहत होते.
बलगवडे येथील वैष्णव शिंदे-पाटील या तरुणावर पोलिसाचा संशय आहे. पण गुरुवार सायंकाळी तो पोलिसांच्या हाती लागला आहे . तो मयत शिंदे याची गाडी घेऊन पसार झाला होता.
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ सह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.



