# सावळजच्या मेघा तोडकर यांना साहित्य सेवा पुरस्कार – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

सावळजच्या मेघा तोडकर यांना साहित्य सेवा पुरस्कार

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव, रोखठोक न्यूज नेटवर्क

सावळज (ता.तासगाव) येथील मेघा संभाजी तोडकर या कन्येला मध्यप्रदेशातील नमो फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा महत्त्वाचा हिंदीचे प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर सन्मान सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पीएचडी करीत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल सावळज व परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

हिंदीचे प्रसिद्ध कादंबरीकार प्रेमचंद यांच्या व्यक्तिमत्व आणि कृतीत्वाविषयी समग्र माहिती विशद करणाऱ्या कवितेसाठी हा पुरस्कार मेघा तोडकर यांना मिळाला. यासाठी मेघा तोडकर यांना हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी डॉ. शहनाज सय्यद,डॉ. प्रकाश गुंज,डॉ.संतोष कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

मेघा तोडकर यांना शिवाजी विद्यापीठातील संशोधना साठी विभागीय शिष्यवृत्ती लाभली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे मूळ गाव सावळज असून त्यांचे आई वडील शेती करतात. त्यांची द्राक्ष शेती आहे. माळी समाजातील अतिशय खडतर परिस्थितीतील कुटुंबातून शिक्षण घेत असलेल्या कन्येने राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केल्याने सावळज परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!