# सावळजमध्ये पावसाचा कहर व अतिवृष्टी – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

सावळजमध्ये पावसाचा कहर व अतिवृष्टी

ढगफुटी सदृश्य पाऊस , अनेक पुल पाण्याखाली

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव : रोखठोक न्यूज नेटवर्क

सावळजसह परीसरात गुरूवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळुन अतिवृष्टी झाली. या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले, तर अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले, बंधारा फुटला, शेतातील माती वाहून गेली. ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने अनेक भागात नुकसान होवुन जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी दुपार पासूनच सावळजसह परीसरात जोरदार पाऊसाने सुरूवात केली. हळूहळू पावसाचा जोर वाढुन रविवारी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळू लागला. या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरले. त्यामुळे साहित्याचे मोठे नुकसान झाले.

अतिवृष्टीमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीला पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे सिद्धेवाडी-यल्लमा पूल, सावळज-जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुल, सावळज – वाय-फाय रस्त्यावरील पूल ,तर गव्हाण- मनेराजुरी मार्गावरील पुल पाण्याखाली गेले . सिध्देवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.


सिद्धेवाडी तलावाच्या सांडव्यावरील धबधब्याचे रुद्र रूप पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभर व रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे तासगाव तालुक्याचे प्रमुख पीक असणाऱ्या द्राक्ष बागेच्या छाटण्या खोळंबल्या आहेत. सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेच्या मुळ्यांची वाढ थांबली आहे. अद्याप द्राक्ष बागेच्या फळ छाटणी न झाल्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!