# जर दीड दिवसाच्या उपोषणाने पाणी आलं तर 47 वर्ष काय केलं? – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

जर दीड दिवसाच्या उपोषणाने पाणी आलं तर 47 वर्ष काय केलं?

संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत स्वप्निल पाटलांचा घणाघात

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

केंद्रात व राज्यस्तरावर काकांनी पाठपुरावा करून मंजुरी आणल्याचे कळल्यानंतर निवेदन टाईप करायचे, उपोषणाचे नाटक करायचं व आम्ही पाणी आणले म्हणून टीमक्या वाजवायच्या.जर खरोखरच निवेदन देऊन आणि दीड दिवस उपोषण करून पाणी येत असेल तर आमदारकीच्या 35 व जिल्हा परिषदेच्या बारा वर्षाच्या काळात पाणी का आले नाही ? असा संतप्त सवाल विचारतानाच अजून अर्धा दिवस उपोषण करा व राहिलेल्या भागाला लगेच पाणी आणा असा टोला रोहित पाटील यांचे नाव न घेता स्वप्नील पाटील यांनी लगावला.
महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आरवडे येथे आयोजित प्रचार सभेत स्वप्निल पाटील यांनी रोहित पाटील व सुरेश पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावेळी व्यासपीठावर सुखदेव पाटील, सुनील पाटील, आर.डी.पाटील, प्रमोद शेंडगे, संदेश भंडारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्वप्नील पाटील म्हणाले, दिवाळी देण्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या घरात दोन लाडू चार करंज्या व बारा शंकरपाळ्या देऊन त्याबरोबर पैशाची पाकीट देताना रोहित पाटलांची माणसे सापडली. आमदारकीचा पगार व आठ एकर बागेतून एवढे तीन तीन हजार रुपये वाटायला कुठून येतात. नक्की ते पैसे कुठून आणतात असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
स्वप्निल पाटील म्हणाले, प्रत्येक वेळेला नवीन खोटं बोलायचं धंदा यांनी काढला आहे. रोहित पाटील विमानाने दिल्लीला,काश्मीरला जाणार त्याचे चुलते, चुलत भाऊ या सगळ्यांचे बरं चाललंय मात्र मतदारसंघाला दहा वर्षाचा सुतक यांनी कायम ठेवले आहे. त्यामुळे लोकांनी आता खोट्या सहानभूतीला बळी पडू नये कवठेमंकाळ मतदार संघात आपल्याला आता परिवर्तन घडवायचा आहे आणि संजय काकांना विजयी करायचंय असे आवाहन यावेळी स्वप्नील पाटील यांनी केले.

पार्टी नाही कमिशन एजंट वाढवले.

यांनी आता पार्टी व कार्यकर्ते राहिले नाहीत. आणि गावोगावी पार्टी वाढवण्यापेक्षा कमिशन एजंट वाढवले आहेत एजंट कडून कमिशन गोळा करायचा उद्योग सध्या सुरू आहे . निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्त्यांना महत्त्व आले आहे असा घनाघाती आरोप यावेळी स्वप्नील पाटील यांनी केला

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!